भारत आणि दक्षिण आफ्रिका यादोन संघात सुरू असलेल्या टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवार दिनांक १२ जून रोजी कटक येथील बाराबती स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने भारावर ३ गडी राखत विजय मिळवला. त्यानंतर सोशल माडियावर भारतीय संघाच्या चाहत्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि भारतीयसंघातील खेळाडूंवर टीका करण्यास सुरूवात केली. यावेळी सर्वात जास्त टीकेचा धनी झाला भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड.
If overrated has a face .#INDvSA #RuturajGaikwad pic.twitter.com/bmz2kYsOVt
— why (@ParvNarendra) June 12, 2022
कटक टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने १४८ धावा केल्या. यादरम्यान संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड अवघी एक धाव काढून बाद झाला. त्याला कागिसो रबाडाने बाद केले. ऋतुराजला बाद केल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याला ट्रोल केले. ऋतुराजने मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यात छोटी पण चांगली खेळी केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यांत भारताला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असताना ऋतुराज अयशस्वी झाला त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या विरोधात मीम्स व्हायरल होण्यास सुरुवात झाली.
https://twitter.com/CRICOMEE/status/1535980583649943552?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1535980583649943552%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fd-8920899502480932185.ampproject.net%2F2205270638004%2Fframe.html
कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान ऋतुराज आणि इशान किशन भारतासाठी सलामीला आले. पण ऋतुराजने फार लवकर विकेट गमावली. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने रबाडाला विकेट दिली. तो झेलबाद झाला. त्याचा झेल केशव महाराजने टिपला. त्यामुळे भारताला चांगली सुरुवात मिळू शकली नाही, आणि भारतीय संघ चांगली धावसंख्य करण्यास अपयशी ठरला. त्यानंतर सोशल मीडियावरील मीमर्सने त्याला चांगलेच धारेवर धरले.
& the flopmaster begins.. #RuturajGaikwad pic.twitter.com/pb1quaimwc
— Akash (@AkashPatel8474) June 12, 2022
https://twitter.com/RgF07/status/1535082540578377728?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1535082540578377728%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fd-8920899502480932185.ampproject.net%2F2205270638004%2Fframe.html
दरम्यान, या सामन्यात भारताने २० षटकात ६ विकेट्स गमावत १४८ धावा केल्या आहेत. या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारत दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे प्रयत्न करणार आहे. दिनेश कार्तिकने फिनीशरची भुमिका बजावत २१ चेंडूत २ षटकार आणि २ चौकार मारले असता ३० धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने ४० आणि इशान किशनने ३४ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रेयसने ४० धावा केल्या अन् युवराजचा विक्रम मोडीत काढला, वाचा काय आहे विक्रम
सामना हातात असताना ‘इथे’ झाली चूक, नाहीतर विजय आमचाच होता; रिषभ पंतची प्रतिक्रिया