---Advertisement---

अख्खा पब्लिक जानता है कौन आने वाला है..! रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्सचा वर्षाव

On: मंगळवार, डिसेंबर 15, 2020 11:21 PM
---Advertisement---

अनेक अफवा आणि अटकळींना पूर्णविराम देत भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मंगळवारी (१५ डिसेंबर) पहाटे त्याने ऑस्ट्रेलियासाठी उड्डाण केल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

कित्येक चाहत्यांनी सोशल मीडियावर जबरदस्त मिम्स शेअर करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. एका चाहत्याने तर रणबीर सिंगचा सिम्बा चित्रपटातील भन्नाट फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर, ‘अख्खा पब्लिक को मालूम है कौन आने वाला है’ असे लिहिले आहे. तर एका चाहत्याने ‘मिठाई बाट दिजिये खुशी का माहोल आया है,’ असे मिम पोस्ट केले आहे.

https://twitter.com/InningStar/status/1337442436876931074?s=20

https://twitter.com/emsane_tweets/status/1337331099337252866?s=20

https://twitter.com/RohitianShubham/status/1338744393642037251?s=20

दुबईमार्गे झाला रवाना
बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा पहाटे दुबईमार्गे ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर तो क्वारंटाईन कालावधीत आपल्या तंदुरुस्तीवर काही मेहनत घेईल. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर, तो ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल.”

आयपीएल दरम्यान झाली होती दुखापत
रोहितला युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० वेळी हॅमस्ट्रींगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो तीन सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. त्याच वेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची घोषणा झाली. त्यात रोहित शर्माचा समावेश केला गेला नव्हता. रोहितची निवड न झाल्याने बराच वाद निर्माण झाला होता. अखेरीस, निवड समितीने रोहितचा समावेश कसोटी संघात केला.
दरम्यान, रोहितने आयपीएलमधील अखेरच्या साखळी सामन्यातून मैदानावर पुनरागमन केले. त्यानंतरही संघाला अंतिम फेरीत विजय मिळवून देताना अर्धशतक झळकावले. मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचव्यावेळी आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते.

रोहितने घेतले द्रविडचे मार्गदर्शन
भारताचे इतर खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर ही रोहित भारताचा माजी खेळाडू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. रोहित ऑस्ट्रेलियाला कधी जाणार आणि किती सामने खेळणार? या सर्व प्रश्नांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अब आयेगा मजा! रोहित झाला ऑस्ट्रेलियाला रवाना; खेळणार ‘इतके’ कसोटी सामने

जखम अजूनही ताजी! मिचेल स्टार्क विसरू शकत नाही भारताविरुद्धचा ‘हा’ पराभव

‘या’ फलंदाजाने करावी ऑस्ट्रेलियासाठी सलामीला फलंदाजी, माजी फलंदाज ब्रॅड हॅडिनचे मत 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---