---Advertisement---

टॉप ५: २०१९ मधील कबड्डीतील ५ अविस्मरणीय क्षण

On: मंगळवार, डिसेंबर 31, 2019 4:24 PM
---Advertisement---

आज ३१ डिसेंबर, २०१९ वर्षाचा शेवटचा दिवस. वर्षभरात कबड्डीत अनेक अविस्मरणीय क्षण बघायला मिळाले. दिवसेंदिवस कबड्डीची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. २०१९ मधील कबड्डीत काही अविस्मरणीय क्षण आले. त्याचाच आढावा घेणारा हा लेख.

६६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रेल्वेला दुहेरी यश

२०१९ मध्ये झालेल्या ६६ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय रेल्वेच्या पुरुष व महिला संघानी विजेतेपद पटकावले. रोहा येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय रेल्वेच्या पुरुष संघाने तर पटना येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय रेल्वे महिला संघाने विजेतेपद पटकावले.

एकाच वर्षांत अजय ठाकूर पद्मश्री व अर्जुन पुरस्काराने सन्मानित

भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार अजय ठाकूरला २०१९ मध्ये सुरुवातीला पद्मश्री पुरस्काराने तर नंतर अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. कबड्डी प्रेमींसाठी हा क्षण अभिमानास्पद होता. तसेच अजय ठाकुर याचवर्षी विवाहबद्ध झाला.

एकाच वर्षांत प्रो कबड्डीला मिळाले दोन नवीन विजेते

५ जानेवारी २०१९ ला प्रो कबड्डी सिजन ६ चा अंतिम सामना झाला होता. बेंगळुरू बुल्सने सिजन ६ चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रो कबड्डी सिजन ७ चा अंतिम सामना झाला. सिजन ७ चे बंगाल वॉरियर्सने विजेतेपद पटकावले. एकाच वर्षांत प्रो कबड्डीला दोन नवीन विजेते मिळाले. तसेच यावर्षी पहिल्यादांच प्रो कबड्डी आधी पीकेल वर्ल्ड ऑल स्टार सामन्यात वर्ल्ड सेव्हनने इंडिया सेव्हन संघाचा पराभव केला.

पहिल्या कबड्डी ज्युनिअर वर्ल्डकपमध्ये इराण अजिंक्य

२०१८ ला आशियाई स्पर्धेत इराण पुरुष व महिला कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकत कबड्डी वर्तुळात आपली ओळख निर्माण केली होती. २०१९ मध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या ज्युनिअर कबड्डी वर्ल्डकपचे इराण संघाने विजेतेपद पटकावून इतिहास घडवला. मात्र यास्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने सहभाग घेतला नव्हता.

दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्व

डिसेंबर २०१९ मध्ये नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. भारतीय पुरुष संघाने श्रीलंका संघाला तर भारतीय महिला संघाने नेपाळ संघाला अंतिम फेरीत पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. श्रीलंका पुरुष संघ व नेपाळ महिला संघ पहिल्यांदाच दक्षिण आशियाई स्पर्धेत कबड्डीचा अंतिम सामना खेळले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---