टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमधील गुरुवारच्या दिवसाची (५ ऑगस्ट) सुरुवात भारतीय संघासाठी उत्कृष्टरित्या झाली. भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षांचा दुष्काळ संपवत ऑलिम्पिक पदक आपल्या नावे केले. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जर्मनीला ५-४ ने पराभूत केले. त्याच वेळी पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याचा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काहीशी निराशाजनक कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या तीनही भारतीय खेळाडूंना अव्वल २० खेळाडूत स्थान पटकावता आले नाही.
अशी राहिली भारतीय खेळाडूंची कामगिरी
गुरुवारी पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत केटी इरफान, संदीप कुमार व राहुल रोहीला त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. संदीप कुमार याने शर्यतीची सुरुवात अत्यंत वेगात करत पहिल्या ९ किलोमीटर अंतरात दुसरे स्थान काबीज करून ठेवले होते. मात्र, त्यानंतर त्याचा खेळ घसरला व १ तास २५ मिनिटे ७ सेकंदाची वेळ नोंदवून २३ व्या क्रमांकावर शर्यत समाप्त केली.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Athletics
Mien's 20km Race Walk ResultsPutting up a strong performance early on in the Race, #SandeepKumar finishes 23rd clocking 1:25:07. Spirited effort champ👏🙌 #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India
📸Reuters / Kim Hong-ji pic.twitter.com/KchB7Tbrq5
— Team India (@WeAreTeamIndia) August 5, 2021
युवा राहुल रोहिला आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यात अपयशी ठरला. त्याने ४७ वा क्रमांक प्राप्त केला. एकवेळ पहिल्या दहा खेळाडूंमध्ये असलेला अनुभवी केटी इरफान मांसपेशी ताणल्या गेल्याने काहीसा मागे पडला व त्याला ५१ व्या स्थानिक शर्यत समाप्त करावी लागली.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Athletics
Men's 20km Race Walk Results#RahulRohilla finished 47th clocking 1:32:06 while @irfangoodstar clocked his SB time of 1:34:41 to finish 51st in the event. Brave efforts by our athletes! #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India https://t.co/Y8xSZf6G4z— Team India (@WeAreTeamIndia) August 5, 2021
या महिला खेळाडूही आजमवणार नशीब
महिलांची २० किलोमीटर चालण्याची स्पर्धा शुक्रवारी (६ ऑगस्ट) पार पडेल. या स्पर्धेमध्ये भारताचे आव्हान प्रियंका गोस्वामी व भावना जाट या सादर करतील. प्रियंकाही राष्ट्रीय विजेती खेळाडू आहे.
या खेळाडूंनी पटकावली पदके
वीस किलोमीटर अंतराच्या चालण्याच्या या स्पर्धेत इटलीच्या मक्सिमो स्टॅनो याने १ तास २१ मिनिटे ५ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. रौप्य पदक व कांस्यपदक अनुक्रमे यजमान जपानच्या कोकी इकाडा व ताशिकाझू यामानिची यांनी पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘वनडे, टी२० विश्वचषक विजय, आता सगळचं विसरा’; गंभीरच्या ट्वीटवर भडकले क्रिकेटप्रेमी, केले ट्रोल