---Advertisement---

Video: बेअरस्टोच्या विकेटच्या रिव्ह्यूसाठी शमी-शार्दुलने असं मनवलं ‘कर्णधार’ कोहलीला, स्वत:च केलाय खुलासा

On: गुरूवार, ऑगस्ट 5, 2021 3:13 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवस पूर्णपणे भारतीय संघाच्या नावावर राहिला. या सामन्यात कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाजांचा टिकाव लागला नाही. इंग्लंड संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १८३ धावांवर संपुष्टात आला.

या सामन्यात मोहम्मद शमीच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टो पायचीत झाला होता. त्याला बाद करणे इतके सोपे नव्हते. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने जॉनी बेअरस्टोला बाद करण्यामागचा मजेशीर किस्सा सांगितला.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाकडून रूट आणि बेअरस्टो चांगली फलंदाजी करत होते. परंतु, शमीचा आत येणारा चेंडू बेअरस्टोच्या पॅडला जाऊन धडकला आणि भारताच्या सर्व खेळाडूंनी जोरदार अपील केली. परंतु, पंचांनी हे अपील फेटाळून लावली होती. त्यावेळी शमीने कर्णधार कोहलीला रिव्ह्यू घेण्यास प्रवृत्त केले.

इतर सर्व खेळाडूंना वाटत होते की,चेंडू पॅडला लागण्यापूर्वी बॅटला लागला आहे. तितक्यात शार्दुल आला आणि त्याने देखील शमीला समर्थन करत विराटला रिव्ह्यू घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर विराटने रिव्ह्यू घेतला आणि फलंदाज बाद झाला. शार्दुलच्या मते, विराटला असा एक व्यक्ती हवा होता, जो शमीला पाठिंबा देत असेल. अशा परिस्थितीत स्वत: शार्दुल समर्थन देण्यासाठी आला होता.

बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामधे शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी संवाद साधताना दिसून येत आहेत. आर अश्विनऐवजी संधी देण्यात आलेल्या शार्दुलने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने जो रूट आणि ऑली रॉबिन्सनला बाद करत माघारी धाडले होते. तर मोहम्मद शमीने जॉनी बेअरस्टो, डॉम सिब्ली आणि लॉरेन्सला माघारी धाडले.(Know how mohammad shami and shardul thakur persuaded Virat Kohli to take review)

भारतीय फलंदाजांची संयमी सुरुवात 
भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा डाव अवघ्या १८३ धावांवर गुंडाळला. त्यानंतर आता भारतीय संघातील फलंदाजांवर संघाला चांगल्या स्थितीत पोहचवण्याची जबाबदारी असणार आहे. या सामन्यात मयंक अगरवालच्या अनुपस्थित केएल राहुलला डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली होती. पहिल्या दिवसाच्या अखेर भारतीय संघाला बिनबाद २१ धावा करण्यात यश आले आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा हे दोघेही प्रत्येकी ९-९ धावांवर फलंदाजी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘वनडे, टी२० विश्वचषक विजय, आता सगळचं विसरा’; गंभीरच्या ट्वीटवर भडकले क्रिकेटप्रेमी, केले ट्रोल

रिषभच्या त्या कृत्याला पाहून चाहत्यांना आली धोनीची आठवण; म्हणाले, ‘हळू हळू शिकतोय’

ENGvIND: कर्णधार कोहलीने अश्विनऐवजी का केली जडेजाची निवड? फिरकीपटूने सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---