आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिल्या फेरीने श्रीगणेशा झाला आहे. ही फेरी २२ ऑक्टोबरपर्यंत चालेल. नंतर २३ ऑक्टोबरपासून सुपर १२ फेरीला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाला थेट सुपर १२ फेरीत प्रवेश मिळाला आहे. दरम्यान, भारतीय संघाने या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या ताफ्यात मार्गदर्शक एमएस धोनी दाखल झाला आहे.
माजी कर्णधार एमएस धोनीला या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नियुक्त केले आहे. त्यामुळे धोनी इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सला मिळवून दिल्यानंतर टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाला मार्गदर्शन करण्यासाठी संघात दाखल झाला आहे.
बीसीसीआय धोनी भारतीय संघात दाखल झाल्याचे फोटो रविवारी(१७ ऑक्टोबर) शेअर केले आहेत. या फोटोत धोनी भारताची जर्सी घालून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे. या फोटोंना बीसीसआयने कॅप्शन दिले आहे की ”किंग’चे मोठ्या उत्साहाने स्वागत. एमएस धोनी नव्या भूमीकेसह भारतीय संघात परत आला आहे.’
https://twitter.com/BCCI/status/1449766996879548428
भारताचे या टी२० विश्वचषकातील अभियान २४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारताला साखळी फेरीत न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पहिल्या फेरीतून सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या दोन संघांशी दोन हात करायचे आहेत.
चेन्नईला चौथे विजेतेपद मिळवून दिले
शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ हंगामाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध २७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने चौथ्यांदा आयपीएलच्या चषकावर नाव कोरले. विशेष म्हणजे चारही वेळेस धोनीच्याच नेतृत्त्वाखील चेन्नईने विजेतेपद मिळवले आहे.
हे विजेतेपद जिंकल्यानंतर दोनच दिवसात धोनी भारतीय संघासह दिसला आहे.
धोनी नव्या भूमीकेत
धोनी आत्तापर्यंत भारताकडून फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधाराच्या रुपात खेळला आहे. पण आता तो भारतीय संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमीकेत दिसणार आहे. धोनीने यापूर्वी झालेले सर्व ६ टी२० विश्वचषक स्पर्धा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून खेळल्या आहेत. पण आता ७ व्या टी२० विश्वचषकादरम्यान तो मार्गदर्शक म्हणून दिसेल. विशेष म्हणजे धोनी या जबाबदारीबद्दल कोणतेही मानधन घेणार नाही.
धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आत्तापर्यंत कर्णधार म्हणून भारताला ३ आयसीसीच्या ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
युजवेंद्र चहलचं कारण आणि युवराज सिंगला अटक! पण रोहित शर्माचेही ‘प्रकरणात नाव’, वाचा अधिक
विराट म्हणतो, ‘२००७ टी२० विश्वचषकाने कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला, एक तरुण खेळाडू म्हणून मला…’
गंभीर म्हणतो, आयपीएल २०२२मध्ये सीएसकेच्या ‘या’ ३ शिलेदारांना रिटेन करेल; पण धोनी…