अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू व कर्णधार लिओनेल मेस्सी हा ख्रिस्टीयानो रोनाल्डोसह जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू मानला जातो. सामन्यामध्ये नेहमी पूर्ण योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मैदानावर असताना मेस्सी स्वतःला किती झोकून देतो याचा प्रत्यय नुकताच फुटबॉलप्रेमींना आला. पायाला गंभीर दुखापत झाली असतानाही त्याने मैदान न सोडता संघाला विजय मिळवून दिला.
मेस्सीची झुंजार वृत्ती
सध्या दक्षिण अमेरिकेत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा खेळविण्यात येत आहे. या स्पर्धेची दुसरी उपांत्य लढत बुधवारी (७ जुलै) अर्जेंटिना विरुद्ध कोलंबीया अशी खेळली गेली. पेनल्टी शूटआउटमध्ये गेलेल्या या सामन्यात विजय मिळवून अर्जेंटिनाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात ५५ व्या मिनिटाला मेस्सीच्या पायातून चेंडू काढून घेण्यासाठी कोलंबीयाचा खेळाडू फ्रॅन्क फॅब्रा याने त्याच्या पायावर जोरदार किक मारली. फॅब्रा याच्या बुटाचे खिळे सरळ मेस्सीच्या घोट्यावर बसल्याने त्याच्या घोट्यातून रक्त वाहू लागले. फॅब्रा याच्या या कृतीसाठी रेफ्रीने त्याला यलो कार्डदेखील दाखवले. या दुखापतीनंतर ही मेस्सीने मैदानातून बाहेर न जाता संघाचे नेतृत्व करणे सुरू ठेवले.
चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
मेस्सीने दाखवलेल्या झुंजार वृत्तीचे अनेक चाहत्यांनी तोंडभरून कौतुक केले. एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना लिहिले, ‘त्याच्या जागी आणखी कोणी असता तर केव्हाच मैदानातून बाहेर पडला असता. मात्र, तो मेस्सी आहे. तो नेहमी संघाचा आणि देशाचा विचार करतो.’
मेस्सीच्या या कामगिरीने अनेक आजी-माजी फुटबॉलपटूदेखील प्रभावित झाले.
https://twitter.com/AkashSa88116203/status/1413023469818695684
You have lost your blood, you have played, you have not let anyone understand, you will get the benefits of your blood.#Argentina #Messi pic.twitter.com/CaDmLToROX
— Jahid Hassan Rocky (@RockySarder) July 8, 2021
Messi played the whole match like this, with blood and sweat. What a leader.
That's my G.O.A.T 🐐 pic.twitter.com/5ONTjKCbUL
— AltcoinAce ♠️ (@the_altcoinace) July 7, 2021
अर्जेंटिनाचा विजय
पहिल्या उपांत्य फेरीत ब्राझीलने विजय मिळवल्यानंतर अर्जेंटिना आणि कोलंबिया आमने-सामने आले. या सामन्याच्या सातव्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या लौतारो मार्टिनेजने गोल करत संघाला आघाडीवर नेले. या गोलसाठी मेस्सीने असिस्ट दिला. त्यानंतर, कोलंबियासाठी लुईस डायज याने ६१ व्या मिनिटाला गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर, दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले व सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. अर्जेंटिनाचा गोलरक्षक असलेला एमिलियानो मार्टिनेज पेनल्टी शूटआउटमध्ये संघाच्या विजयाचा नायक ठरला. त्याने तीन पेनल्टी अडवून संघाला अंतिम फेरीत नेले.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुलने सलामीला ५ शतके ठोकलीत, तरीही त्याला खाली खेळवण्याचा अट्टाहास का? दिग्गजाचा मोठा प्रश्न
इंग्लंडमध्ये भारतीय संघाला भोवते सलामीवीरांचे अपयश, ‘ही’ आहे २० वर्षातील सर्वात यशस्वी जोडी
सारा तेंडुलकरने ‘ती’ पोस्ट शेअर करताच, चाहत्यांना पुन्हा आठवला शुबमन गिल