कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला गेला. दोहा येथील लुसेल स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउटमध्ये बाजी मारत विश्वचषक आपल्या नावे केला. या सामन्यात पहिला गोल झळकावत अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी याने दोन विक्रम आपल्या नावे नोंद केले.
अंतिम सामन्याच्या पहिल्या वीस मिनिटात फ्रान्स संघ केवळ एकदाच अर्जेंटिनाच्या क्षेत्रात धडक देऊ शकला. 20 व्या मिनिटाला फ्रान्सच्या बचावपटूने केलेल्या धसमुसळ्या खेळाचा फायदा उठवत मेस्सीने मिळालेली पेनल्टी सत्कारणी लावत संघाला आघाडीवर नेले. या गोलसह मेस्सीने दोन विक्रम आपल्या खात्यात जमा करून घेतले. मेस्सीने याच सामन्यात आणखी एक गोल करत संघाला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली होती.
ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो याच्यानंतर कोपा अमेरिका व विश्वचषकात मिळून 25 गोल करणारा दुसरा फुटबॉलपटू बनला. तसेच आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना म्हणजेच फिफाने आयोजित केलेल्या स्पर्धेत सर्वाधिक मिनिटे खेळण्याचा विक्रमही मेस्सीच्या नावे जमा झाला. त्याने इटलीचे दिग्गज डिफेंडर पावलो मालदीनी यांना मागे सोडले. तसेच विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रत्येक सामन्यात गोल झळकावण्याचा मान देखील त्याला मिळाला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत, नेदरलँडविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत व क्रोएशियाविरुद्ध उपांत्य फेरीत गोल झळकावलेले.
( Messi Set New Records After Goal On Penalty)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार का? पत्रकार परिषदेत केएल राहुलने केला खुलासा
कसोटीमध्ये अक्षर पटेलचा बोलबाला, भारताच्या क्रिकेट इतिहासात केली कोरले आपले नाव