काल, 26 जूनला फिफा विश्वचषकात पार पडलेल्या अर्जेंटिना विरुद्ध नायजेरिया सामन्यात अर्जेंटिनाने 2-1 असा विजय मिळवला. या विजयाबरोबरच त्यांनी बाद फेरीतील त्यांचे स्थान पक्के केले.
अर्जेंटिनाच्या या विजयात कर्णधार मेस्सीने सामन्याच्या 14 व्या मिनिटाला एक गोल करत महत्त्वाचा वाटा उचलला. 2018च्या फिफा विश्वचषकातील मेस्सीचा हा पहिलाच गोल आहे. या गोल बरोबरच मेस्सीने एक खास विक्रम केला.
मेस्सी फुटबॉल विश्वचषकात किशोरवयीन (टीनएजर) म्हणून तसेच त्याच्या वयाच्या विशीत आणि तिशीतही गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे.
2006 च्या विश्वचषकात त्याने 18 वर्षांचा असताना गोल केला होता. त्यानंतर 2014 च्या विश्वचषकात त्याने वयाच्या 26-27 व्या वर्षी गोल केले. तसेच कालच्या नायजेरियाविरुद्धच्या सामन्यातही त्याने गोल केला. यावेळी त्याचे वय 31 वर्षे 2 दिवस एवढे होते.
तसेच मेस्सीचे आता 65 आंतरराष्ट्रीय गोल झाले आहेत. सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करण्यात मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर 85 गोलसह पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. तर 64 गोलसह तिसऱ्या भारताचा कर्णधार सुनिल छेत्री आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–फूटबाॅल जगत मेस्सीमय, मेस्सीने विश्वचषकात खाते उघडले
–फिफा विश्वचषकात वयाच्या ४५व्या वर्षी केला त्याने अजब कारनामा