---Advertisement---

या दोन कारणांमुळे टीम अर्जेंटीनाला मेस्सी संघात हवाच…

---Advertisement---

२०१४ फिफा विश्वचषकाचा उपविजेता अर्जेंटीनाचा संघ २०१८च्या फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीतूनच बाहेर पडला. या स्पर्धेत स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीला हवी तशी कामगिरी करता नाही आली.

तसेच पुन्हा एकदा मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. मेस्सी संघात असताना त्याच्या संघाला अशा तीन मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यात अपयश आले आहे.

मेस्सीने २०१६ च्या कोपा अमेरिका स्पर्धेनंतरच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीना पेनाल्टीमध्ये चिलीकडून २-४ ने पराभूत झाला होता.

मात्र रशियातील विश्वचषकाच्या पात्रतेसाठी मेस्सी परत संघात दाखल झाला. पण या स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीमुळे परत एकदा त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला सुरूवात झाली.

अर्जेंटीना फुटबॉल असोसिएशनचे (एएफए) अध्यक्ष क्लाउडियो टॅपिया यांनी मेस्सीच्या निवृत्तीवर पुर्णविराम दिला आहे.

“मेस्सीला संघ प्रिय असल्याने तो संघात कायम राहणार आहे”, असे टॅपिया म्हणाले.

“सध्या तरी आम्ही त्याला विश्रांती दिली आहे. आम्ही सतत विश्वचषकाविषयीच बोलत नाही. या सुट्टीत जरूर तो या बद्दल विचार करेल. तसेच मेस्सीची संघाला आर्थिकदृष्ट्याही तेवढीत गरज आहे”, असेही ते पुढे म्हणाले.

अर्जेंटीनाच्या संघाने २०१८च्या विश्वचषकात साखळी फेरीत आइसलॅंड विरुद्ध १-१ असा अनिर्णीत, क्रोएशिया विरुद्ध ०-३ असा मोठा पराभव आणि नायजेरिया विरुद्ध २-१ असा विजय अशी कामगिरी केली

अर्जेंटीनाच्या पुढच्या हंगामाला सप्टेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. त्यांचा मैत्रीपुर्ण सामना ग्वातमाला विरुद्ध ७ सप्टेंबरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

खेळाडूंच्या रुममध्ये चांगल्या एसीच्या मागणीवरुन हर्षा भोगले कडाडले!

यावर्षी लीव्हरपूलच चॅम्पियन्स लीग जिंकणार- हेरडॅन शाकिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment