राशिद खान (Rashid Khan) आयपीएलमध्ये ‘गुजरात टायटन्स’कडून (Gujrat Titans) खेळत आहे. अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू राशिदने अनेक प्रसंगी दमदार कामगिरी केली आहे. आता त्याच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. दरम्यान त्याला राशिदला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याला दक्षिण आफ्रिका टी20 लीगचा संघ एमआय केप टाऊनचा (MI Cape Town) कर्णधार बनवण्यात आले आहे. एमआय केपटाऊनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
एमआय केप टाऊनने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की राशिदला दक्षिण आफ्रिका टी20 लीग 2025 साठी कर्णधार बनवण्यात आले आहे. राशीद दुखापतीमुळे गेल्या हंगामात खेळू शकला नव्हता. मात्र तो आता परतला असून पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
‘राशिद खान’च्या (Rashid Khan) टी20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आतापर्यंत एकूण 451 टी20 सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 622 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणजे टी20 सामन्यात 17 धावांत 6 विकेट घेणे आहे. राशिदने टी20 मध्ये चमकदार फलंदाजी देखील आहे. त्याने 273 डावात 2,544 धावा केल्या आहेत.
𝙆aptein is 𝐑eady for Season 3! ✨
Full Story Here ➡️https://t.co/kjHU94R7m4#OneFamily #MICapeTown pic.twitter.com/MOvOVHrWgq
— MI Cape Town (@MICapeTown) December 20, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या निशाण्यावर मोठा रेकाॅर्ड! विराट-वाॅर्नरसह धवनलाही टाकणार मागे
पाकिस्तानच्या सामन्यात मोठा राडा! खेळाडूंकडून शिवीगाळ? अंपायर बचावासाठी आले
3 सध्याचे भारतीय फलंदाज मेलबर्नच्या मैदानावर आजपर्यंत एकही शतक, अर्धशतक झळकावू शकले नाहीत