नवी दिल्ली। जगभरातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता भारतातील सर्व क्रीडा संबंधित कार्यक्रम स्थगित केले आहेत. अशामध्ये क्रिकेटपटू आपापल्या जवळच्या व्यक्तींशी वेळ घालविण्याबरोबरच सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशीही संवाद साधत आहेत.
अशामध्ये भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने रविवारी (२ ऑगस्ट) आपल्या ट्विटरवर चाहत्यांशी चर्चा केली. यादरम्यान चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची रोहितने उत्तरे दिली तसेच आपल्या कारकिर्दीतील रंजक गोष्टींना उजाळा दिला.
मुंबई इंडियन्सच्या कोणत्या २ माजी खेळाडूंना पुन्हा खेळताना पहायचेय
मुंबईकर रोहितने चाहत्यांशी संवाद साधताना २ माजी खेळाडूंबद्दल चर्चा केली. ज्यांना मुंबई इंंडियन्स संघासाठी खेळताना पुन्हा एकदा ड्रेसिंग रूममध्ये पहायला आवडेल.
“जर तुला एका माजी मुंबईच्या खेळाडूला पुन्हा खेळविण्याची संधी मिळाली, तर तो कोण असेल?” असा प्रश्न एका चाहत्याने यादरम्यान विचारला.
सचिन तेंडुलकर आणि शॉन पोलॉकचे घेतले नाव
या प्रश्नाचे उत्तर देताना रोहितने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि शॉन पोलॉकचे नाव घेतले. सचिनने ५ वर्षे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे तसेच एकदा मुंबईला अंतिम सामन्यातही पोहोचविले. परंतु विजेतेपद जिंकता आले नाही.
तर दुसरीकडे पोलॉकने २००८मध्ये आपल्या निवृत्तीच्या काळात प्रतिष्ठित आयपीएल स्पर्धा खेळली. त्यादरम्यान त्याने १३ आयपीएलचे सामने खेळले. त्यात त्याने मुंबई इंडियन्सकडून ११ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
-तो एक शांत क्रिकेटर होता, द्रविडच्या मदतीने राजस्थान रॉयल्समध्ये झाला विस्फोटक फलंदाज
-कोरोनाबाधीताबरोबर घालवला वेळ, दोन मोठे क्रिकेटर कॅरेबियन लीगमधून बाहेर
-धोनीने सीएसकेला सांगितलं होतं; त्या खेळाडूला घेऊ नका, तो टीमची वाट लावेल
ट्रेंडिंग लेख –
-आजच्याच दिवशी ८८ वर्षांपूर्वी सीके नायडूंनी मारला होता तो ऐतिहासिक षटकार
-वाढदिवस विशेष: शतकातील सर्वोत्तम झेल घेणारा वेसबर्ट ड्रेक्स
-५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक