पाच वेळा इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा किताब आपल्या नावावर करणारा मुंबई इंडियन्स संघ पहिल्यांदा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात मुंबई संघ यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी संघर्ष करताना दिसला. त्यांनी आपल्या चाहत्यांना निराश केले. आयपीएलमधून सर्वप्रथम बाहेर पडल्यानंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने म्हणाला की, त्यांना महत्त्वाच्या गोष्टी नियंत्रण करण्यात अपयश आले. तसेच, त्यांनी चांगली खेळी केली नाही. गुणतालिकेत शेवटच्या स्थानी असलेल्या मुंबईला शनिवारी (दि. २० मे) दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध आपला शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) म्हणाला की, “आमच्या संघात ज्या दर्जाचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडे पाहून प्रामाणिकपणे सांगावे लागेल की, आम्ही चांगली कामगिरी केली नाही. जसे मी आधी म्हणालो की, तो उत्साह नव्हता. काही सामन्यांमध्ये आम्हाला गोष्टी नियंत्रित करता आल्या नाहीत. जर आम्ही तसे करू शकलो असतो, तर आमच्यात सलग ४-५ सामने जिंकण्याचा आत्मविश्वास आला असता. त्यानंतर आम्ही प्लेऑफमध्ये जागा बनवण्यासाठी आव्हान देऊ शकलो असतो. मात्र, आम्हाला ते करण्यात यश आले नाही आणि मी निश्चितच निराश आहे.”
चुकांमध्ये सुधारणा करण्याची गरज
पुढे बोलताना जयवर्धने म्हणाला की, “मुख्य चिंता ही होती की, स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात दबावाशी सामना करण्यात आम्ही अपयशी ठरलो. कोणत्याही सत्रात जेव्हा सुरुवात मंदावते, तेव्हा ही आमच्यासाठी चिंतेची बाब असते. सुरुवातीच्या ४-५ सामन्यांमध्ये आम्ही ज्याप्रकारे जोश दाखवला, आमच्याकडे विजय मिळवण्याची संधी खूप कमी होती. मात्र, आम्ही चुका केल्या आणि आम्हाला यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल इतिहासातील पहिला वाद म्हणजेच ‘स्लॅप-गेट’
वडिलोपार्जित घराला टाळा ठोकत गांगुली जाणार नव्या घरी, आलिशान बंगल्याची किंमत वाचून उडेल झोप