---Advertisement---

आरसीबीविरुद्ध हार्दिक पंड्याने का केली नाही गोलंदाजी? ‘हे’ आहे त्यामागचे कारण

On: शनिवार, एप्रिल 10, 2021 9:26 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. शुक्रवार रोजी (०९ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून त्यांचा दोन गडी राखून पराभव झाला. या पहिल्या सामन्यात मुंईचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने फलंदाजी केली पण तो गोलंदाजी करताना दिसला नाही. त्यामुळे तो जखमी झाला की काय? असा प्रश्न सर्वांपुढे उपस्थित राहू शकतो. तर त्याचे उत्तर मुंबई संघाचा फलंदाज ख्रिस लीनने दिले आहे.

आयपीएल २०२० मध्ये हार्दिक मुंबईकडून गोलंदाजी करताना दिसला नव्हता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात थोडीफार गोलंदाजी केली होती. एका स्पोर्ट वेबसाईटला मुलाखत देताना ख्रिस लिन म्हणाला की, “मला पूर्णपणे माहिती नाही, परंतु हार्दिकला खांद्याची दुखापत झाल्यामुळे त्याला गोलंदाजी करू दिली गेली नाही. सावधगिरी म्हणून संघाने हा निर्णय घेतला आहे. कारण आता तर आयपीएलची सुरुवात झाली आहे. अजून त्याला पुढे हंगामातील १४ आयपीएल सामने खेळायचे आहेत.”

हार्दिकची दुखापत वाढू नये म्हणून त्याला गोलंदाजीस पाठवले गेले नाही. हार्दिकवर फिजीओची आणि डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे.

याबद्दल ख्रिस लिनने सांगितले की, “तो फलंदाजी करतो तेव्हा संघासाठी मोठा आधार असतो. त्याने जरी गोलंदाजी केली तरी संघासाठी ते चांगलेच आहे. हार्दिकने गोलंदाजी केल्यास फलंदाजी करताना आमचा विश्वास वाढतो. परंतु त्याच्या दुखापतीची काळजी घेणे आमचे ही सध्या आमची प्रथामिकता आहे. तो लवकरच तुम्हाला मुंबईकडून गोलंदाजी करताना दिसून येईल.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘माही’भाई विरुद्ध नाणेफेकीस उभारणे माझ्यासाठी खास क्षणांपैकी एक, कर्णधार पंतचे मोठे विधान

CSK vs DC Live: सुरेश रैनाचे अर्धशतकासह दमदार पुनरागमन, मात्र एमएस धोनी शुन्यावर बाद, चेन्नईच्या १६ षटकांत ६ बाद १४३ धावा

व्हिडिओ: ‘मॅक्स’भाऊचा तब्बल १०० मीटर अंतरावर खणखणीत षटकार, कॅप्टन कोहलीची रिऍक्शन होती लक्षवेधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---