शनिवारी (दि. 6 मे) चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 49वा सामना खेळला जात आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 139 धावा केल्या. तसेच, चेन्नईला विजयासाठी 140 धावांचे आव्हान दिले. हा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्स गुणतालिकेतील आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, मुंबई इंडियन्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 139 धावा केल्या.
मुंबईच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबईने आपल्या महत्त्वाच्या तीन विकेट्स या अवघ्या 3 षटकाच्या आत गमावल्या. त्यात कॅमरून ग्रीन (6), ईशान किशन (7) आणि रोहित शर्मा (0) यांचा समावेश होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी रचली. यामध्ये सूर्याच्या 26, तर नेहालच्या 26 धावांचा समावेश होता. सूर्याची विकेट पडल्यानंतर नेहालला ट्रिस्टन स्टब्सची साथ मिळाली. त्यांच्यातही 54 धावांची भागीदारी झाली. यामध्ये स्टब्सच्या 13 आणि नेहालच्या 37 धावांचा समावेश होता. यानंतर नेहाल 51 चेंडूत सर्वाधिक 64 धावा करून तंबूत परतला. यामध्ये 1 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. नेहालव्यतिरिक्त सूर्या (26) आणि स्टब्स (20) यांनाच 20 धावांचा आकडा पार करता आला. त्यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 10 धावांचाही आकडा शिवता आला नाही.
Innings break!
An impressive bowling display by @ChennaiIPL restricts #MI to 139/8 in the first innings 👏🏻👏🏻
Can @mipaltan defend this target and continue their winning run 🤔
Scorecard ▶️ https://t.co/hpXamvn55U #TATAIPL | #CSKvMI pic.twitter.com/BtCs6kUktT
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
यावेळी चेन्नईकडून शानदार गोलंदाजीचे दर्शन घडले. मुंबईला 139 धावांवर रोखण्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) याने मोलाचा वाटा उचलला. त्याने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना फक्त 15 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त दीपक चाहर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. एकूणच या मैदानावर चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी उच्च दर्जाचे प्रदर्शन केले. या तिघांव्यतिरिक्त रवींद्र जडेजा यानेही एक विकेट आपल्या नावावर केली. त्याने सूर्यकुमार यादवचा त्रिफळा उडवत आपल्या खात्यात एक विकेट टाकली.
चेन्नई सुपर किंग्स या हंगामात 5 विजय आणि 11 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे, तर मुंबई संघही 5 विजय आणि 10 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. आता हा सामना जिंकून कोणता संघ गुणतालिकेत आपले स्थान बळकट करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (mi vs csk ipl 2023 mumbai indians score 139 runs in first innings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पथिरानाच्या वेगापुढे मुंबईने 139 धावांवर टेकले गुडघे, चेन्नई करणार का यशस्वी पाठलाग?
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! IPLमध्ये रोहितच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद, स्वप्नातही म्हणेल ‘नकोच’