---Advertisement---

MI vs CSK : आयपीएल इतिहासातील पारंपरिक प्रतिस्पर्धी येणार आमनेसामने, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

On: शनिवार, मे 1, 2021 4:37 PM
MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)
---Advertisement---

आयपीएल हंगामातील बहुप्रतीक्षित सामना आज संध्याकाळी ७.३० वाजेपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. आयपीएल मधील पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आज आमनेसामने असतील. या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघ भन्नाट फॉर्मात आहे. त्यांनी ७ सामन्यात ६ विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे. तर हंगामाच्या प्रारंभी काहीसा संघर्ष करणार्‍या मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात विजय मिळवत पुन्हा फॉर्म परत मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कडवी लढत होण्याची शक्यता आहे. याच निमित्ताने या लेखात आपण आजच्या सामन्यातील दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घेऊया.

मुंबई इंडियन्स –
मुंबई इंडियन्सने आपल्या मागील सामन्यात राजस्थान रॉयल्ससाठी ७ विकेट्सने मात दिली होती. दिल्लीच्या पिचवर मुंबईची फलंदाजी बहरली होती. मात्र चेन्नई विरूद्धच्या सामन्यात फलंदाजीला बळकटी देण्याचे मुंबईने ठरवल्यास ईशान किशनचे संघात पुनरागमन होऊ शकते. जयंत यादवच्या जागी त्याला संघात स्थान दिले जाऊ शकते. मात्र या व्यतिरिक्त संघात इतर कोणताही बदल होण्याची फारशी शक्यता नाही.

मुंबईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, नॅथन कुल्टर नाइल, राहुल चाहर, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट

चेन्नई सुपर किंग्ज –
धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज यंदाच्या हंगामात तुफान फॉर्मात आहे. यंदा त्यांनी केवळ एक सामना गमावला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर त्यांचा संघ समतोल भासतो आहे. अष्टपैलू खेळाडूंमुळे धोनीला प्रत्येक सामन्यात परिस्थितीनुरूप खेळाडूंचा वापर करण्याची मुभा मिळते आहे. शिवाय धोनी विजयी संघ कायम ठेवण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे आजच्याही सामन्यात चेन्नईच्या संघात एकही बदल होणार नाही, असाच अंदाज आहे.

चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेसिस, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, लुंगी एनगिडी, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! डेव्हिड वॉर्नर हैदराबादच्या कर्णधारपदावरुन पायउतार, विलियम्सन नवा कर्णधार

महाराष्ट्र दिन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे महाराष्ट्रीयन फलंदाज 

चेन्नई विरूद्ध मुंबई सामन्यात कोण गाजवणार वर्चस्व? इतिहास आहे या संघाच्या बाजूने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---