---Advertisement---

MI vs CSK: रोहितची ‘हिटमॅन’ खेळी, चेन्नईचा दारुण पराभव!

---Advertisement---

आयपीएल 2025चा 38वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये खेळला गेला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 3 वर्षांनी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. पहिल्याच षटकापासून रोहित शर्मा उत्तम लयीत दिसत होता. रोहितने 45 चेंडूत 76 धावा केल्या. ज्यात 6 षटकार व 4 चाैकारांचा समावेश होता.

रोहित शर्माने या हंगामातील त्याचे पहिले अर्धशतक झळकावले. चेन्नईनं दिलेल्या 176 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने एकतर्फी विजय मिळवला. संघाने 15.1 षटकात व 9 गडी राखून सामना जिंकला. या विजयात रोहित शर्माने शानदार कामगिरी केली. या खेळीसह रोहित शर्मा फाॅर्ममध्ये परतला आहे.

रोहित शर्माच्या विस्फोटक खेळीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. तत्तपूर्वी सीएसकेने टाॅस गमावून मार्यादित 20 षटकात 175 धावा केल्या. ज्यात रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी अर्धशतके झळकावली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---