आयपीएल 2025चा 38वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये खेळला गेला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 9 विकेट्सनी पराभव केला. पहिल्याच षटकापासून रोहित शर्मा उत्तम लयीत दिसत होता. रोहितने 33 चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले तर सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 6 चौकार आणि दोन षटकारांसह आपले 50 धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे दोन्ही फलंदाजांनी त्यांच्या संघाला सहज विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 5 गडी गमावून 176 धावा केल्या. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके झळकावली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. चेन्नई सुपर किंग्जच्या 176 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी मिळून 6 षटकांत 62 धावा केल्या. रायन 24 धावा करून बाद झाला.
He lit up the Mumbai 𝙎𝙆𝙔 with his fireworks 🎇
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
Surya Kumar Yadav remained unbeaten on 68(30) and took #MI home 💙
Scorecard ▶ https://t.co/v2k7Y5sIdi#TATAIPL | #MIvCSK | @surya_14kumar pic.twitter.com/b9lp7LvYZR
यानंतर, रोहित शर्माने सूर्यकुमार यादवसह शतकी भागीदारी केली आणि मुंबईला 9 विकेट्सने शानदार विजय मिळवून दिला. रोहित शर्माने 45 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांसह 76 धावांची शानदार खेळी खेळून नाबाद परतला. तर, सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत जलद 68 धावा केल्या. त्याने आपल्या वादळी खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार मारले. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 54 चेंडूत 114 धावांची नाबाद भागीदारी झाली.
A perfect way to wrap a dominant victory and seal back-to-back home wins 💙@mipaltan sign off tonight by winning round 2⃣ against their arch rival 🥳
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
Scorecard ▶ https://t.co/v2k7Y5tg2Q#TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/u2BDXfHpXJ