इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम सुरू झाला असून रविवारी (२७ मार्च) पहिला डबल हेडर खेळवला जाणार आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात ५ वेळचे आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने असतील. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.०० वाजता नाणेफेक झाली. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईकडून तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मुरुगन अश्विन, रिली मेरेडीथ आणि टायमल मिल्स यांनी पदार्पण केले आहे. तसेच मुंबईने अंतिम ११ जणांच्या संघात ४ परदेशी खेळाडूंना स्थान दिले आहे. यात टीम डेव्हिड, रिली मेरेडीथ आणि टायमल मिल्स यांच्यासह कायरन पोलार्डचा समावेश आहे.
दिल्लीने त्यांच्या अंतिम ११ जणांमध्ये केवळ २ परदेशी खेळाडूंना स्थान दिले आहे. यात टीम सिफर्ट आणि रोवमन पॉवेल यांचा समावेश आहे. याशिवाय शार्दुल ठाकूरने दिल्लीकडून पदार्पण केले आहे.
अंतिम ११ जणांचे संघ
दिल्ली कॅपिटल्स –
पृथ्वी शॉ, टीम सिफर्ट, मनदीप सिंग, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी.
मुंबई इंडियन्स –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, अनमोलप्रीत सिंग, कायरन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बेसिल थम्पी
महत्त्वाच्या बातम्या –