यंदाच्या आयपीएल हंगामातील 63वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एमआयने दिल्लीचा एकतर्फी 59 धावांनी पराभव केला. (Mumbai Beat Delhi) या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पहिल्या डावात सुर्यकुमार यादव (73) आणि नमन धीर (24) यांनी तर गोलंदाजीत मिचेल सँटनर आणि जसप्रीत बुमराह यांनी मोलाची कामगिरी केली. (MI vs DC IPL 2025)
टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमावून 180 धावा केल्या. संघाने पहिल्या 18 षटकात केवळ 130 धावा केल्या होत्या मात्र शेवटच्या 2 षटकांत सुर्यकुमार यादव आणि नमन धीर यांच्या विस्फोटक खेळीने संघाने 48 धावा केल्या. या ठिकाणी सामना मुंबईच्या पारड्यात झुकला. (Turning Point Of the match)
Finisher Mode: Activated ????
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2025
???? Naman Dhir & Surya Kumar Yadav go berserk to take #MI's total to 1⃣8⃣0⃣
Updates ▶ https://t.co/fHZXoEJVed#TATAIPL | #MIvDC | @mipaltan | @surya_14kumar pic.twitter.com/9fTPARylrT
181 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 27 धावांपर्यंत त्यांनी आपल्या तीन प्रमुख फलंदाजांना गमावले. केएल राहुलने फक्त 11 धावा केल्या, तर फाफ डू प्लेसिस आणि अभिषेक पोरेल प्रत्येकी 6 धावांवर माघारी परतले.
विप्रज निगम आणि समीर रिझवी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र विप्रज 20 धावांनंतर बाद झाला. 65 धावांपर्यंत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा हे फिनिशरही या सामन्यात अपयशी ठरले.
समीर रिझवीने एका टोकाने झुंज दिली आणि 39 महत्त्वाच्या धावा केल्या, परंतु त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. दिल्लीने 103 धावांपर्यंत पाच विकेट्स गमावल्या होत्या, पण पुढील 18 धावांमध्ये उरलेले पाच फलंदाजही माघारी परतले.






