मागच्या काही वर्षांमध्ये ‘महिला आयपीएल‘ हा विषय चर्चेत राहिला होता. यावर्षी बीसीसीआयने अखेर महिला प्रीमियल लीगचा पहिला हंगाम आयोजित केला आहे. लीगचा पहिला सामना शनिवारी (4 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जाईल. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या आणि ऐतिहासिक सामन्यात हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्सचे, तर बेथ मुनी गुजरात जायंट्स संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
2008 साली जेव्हा पुरुषांच्या आयपीएलची सुरुवात झाली, तेव्हा कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी ब्रँडन मॅक्युलम (Brendon McCullum) याने धमाकेदार फलंदाजी केली होती. महिला प्रीमियर लीग (WPL) मध्येही अशाच एखाद्या खेळीची अपेक्षा चाहत्यांना असेल. चाहते डब्ल्यूपीएलमधील हा पहिला सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. चला तर जाणून घेऊ हा सामना कुठे आणि कधी पाहता येईल.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील हा सामना कधी खेळला जाणार?
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील हा सामना चार मार्च म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे.
कुठे खेळला जाणार मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात हा सामना?
मुंबई इंडियंस आणि गुजरात जाएंट्स यांच्यातील हा सामना मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल.
किती वाजता सुरू होणार मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सची लढत?
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील हा सामना सायंकाळी लायंकाळी 8.00 वाजता सुरू होईल. नाणेफेक 7.30 वाजता होईल.
कोणत्या टीव्ही चॅनलवर पाहायला मिळणार हा सामना?
महिला प्रीमियर लीगच्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार वायकॉम 18 कंपनीकडे आहे. अशात डब्ल्यूपीएल 2023 चे सर्व सामने स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहायला मिळतील.
फोन किंवा लॅपटॉपवर कसा पाहता येईल लाईव्ह सामना?
या सामन्याची लाईव्ह स्टिमिंग भारतात जिओ सिनेमा ऍपवर पाहता येऊ शकते.
एकही रुपया खर्च न करता कसा पाहाल सामना?
जिओ सिनेमावर या सामन्याचे प्रसारण होत आहे. या ऍपवर सामन्याचे लईव्ह प्रसारन पाहण्यासाठी आपल्याला एकही रुपया देण्याची आवश्यकता नाहीये.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स संघ –
गुजरातः बेथ मुनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सब्बिनेनी मेघना, हरलीन देओल, ऐश गार्डनर, डी हेमलता, किम गर्थ, एनाबेल सदरलँड, स्नेह राणा, हर्ले गाला/अश्वनी कुमारी, मानसी जोशी/मोनिका पटेल, तनुजा कंवर.
मुंबईः यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हिली मॅथ्यूज, नेट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), धारा गुज्जर, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, जितिमनी कलिता, इस्सी वोंग, सोनम यादव/सायका इशाक.
(MI vs GJ When and where will the first match of WPL 2023 be played?)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळी चंदनाचा लेप; विराटने सपत्नीक घेतले महाकालचे दर्शन; पाहा व्हिडिओ
वॉर्नने गोलंदाजीत अनेक विक्रम केले, पण फलंदाजीतील ‘हा’ दुर्मिळ कारनामाही त्याच्याच नावावर