(MI vs GT) आयपीएल 2025च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. (IPL 2025 Eliminator) या विजयासह, मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे, ज्यात त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होईल. एलिमिनेटर सामन्यात, पहिल्या डावात खेळताना मुंबईने 228 धावांचा मोठा स्कोअर केला. प्रत्युत्तरादाखल, शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात गुजरातला फक्त 208 धावा करता आल्या. रोहित शर्मा आणि साई सुदर्शन यांनी या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी खेळली. (Mumbai Indians Beat Gujarat Titans By 20 Runs)
टाॅस जिंकून पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने मर्यादित 20 षटकात 228 धावा जोडल्या, ज्यामध्ये संघाचे दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना खेळणाऱ्या जाॅनी बेअरस्टोने धमाकेदार फटकेबाजी करत केवळ 22 चेंडूत 47 धावा केल्या. हिटमॅन रोहित शर्मा मात्र जबाबदारी घेत एक टोक राखून 80 धावांची मोलाची खेळी खेळली. सामन्यात गुजरातच्या खेळाडूंनी दोनदा रोहित शर्माचे सहज झेल सोडले. ज्याचा रोहित शर्माने पुरेपूर फायदा घेतला. (Rohit Sharma Match Wining Knock)
रोहित शर्माने 50 चेंडूत 81 धावा केल्या. त्याने डावाच्या 17व्या षटकापर्यंत फलंदाजी केली. त्याच्या या खेळीत त्याने 9 चाैकार व 4 षटकार मारल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवने (33 धावा) त्याला चांगली साथ दिली. शिवाय हार्दिक पांड्या (22) तिलक वर्मा (25) यांनी फिनिशिंग टच देत निर्धारित 20 षटकात 228 धावांचा डोंगर उभा केला. (Rohit Sharma Scored 81 Runs)
7000 IPL runs ✅
— Star Sports (@StarSportsIndia) May 30, 2025
300 IPL sixes ✅
A clutch fifty in the Eliminator ✅@ImRo45 powers past two massive milestones in #TATAIPL & looks unstoppable in this high-stakes clash! ????
LIVE NOW ➡ https://t.co/ratPT4LZKS#IPLPlayoffs | Eliminator ???? #GTvMI on Star Sports Network &… pic.twitter.com/DgvJwfR1Oj
He is in the mood tonight ????
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
Rohit Sharma, the ???????????? ???????????????????? ???????????????????????? ????
Updates ▶ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile | @ImRo45 pic.twitter.com/WJsarasZuI
लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. कर्णधार शुबमन गिल 1 धावांवर बाद झाला. साई सुदर्शनने कुशल मेंडिस (20) आणि वॉशिंग्टन सुंदर (48) यांच्यासोबत अनुक्रमे 64 व 84 धावांच्या भागीदाऱ्या केल्या. मात्र, सुंदर बाद झाल्यानंतर गुजरातने नियमित अंतराने विकेट गमावल्या. रदरफोर्ड (24), शाहरुख खान (13) आणि तिवेटिया (16) अपयशी ठरले.परिणामी गुजरातला विजय मिळवता आला नाही.






