---Advertisement---

IPL 2020:… म्हणून हार्दिक पंड्या आणि ख्रिस मॉरिसला मॅच रेफ्रीने दिला इशारा, पाहा व्हिडीओ

On: गुरूवार, ऑक्टोबर 29, 2020 1:15 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 48 वा सामना बुधवारी (28 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा आक्रमक फलंदाज हार्दिक पंड्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसने बाद केले. मात्र, यानंतर मॉरिस आणि हार्दिकमध्ये वाद झाला.

मॉरिसने हार्दिकला केले बाद
मुंबईच्या डावाच्या 19 व्या षटकात बेंगलोरचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस गोलंदाजी करायला आला. त्यावेळी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंड्या फलंदाजी करत होता. मॉरिसने फेकलेल्या 5 व्या चेंडूवर हार्दिकने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, कव्हरवर उभा असलेला क्षेत्ररक्षक मोहम्मद सिराजने त्याचा झेल घेतला.

…त्यानंतर झाली शाब्दिक बाचाबाची
हार्दिक बाद झाल्यानंतर तंबूत परत जात असताना मॉरिस त्याला काहीतरी बोलला. त्याला हार्दिकने उत्तर दिले आणि याचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये झालं. या वादामुळे हार्दिक बराच चिडला होता आणि त्याने मॉरिसला हाताने इशाराही केला.

https://twitter.com/sandybatsman/status/1321508088357154816?s=20

https://twitter.com/imPVK94/status/1321692821808574464

हार्दिक आणि मॉरिसने केलं आचारसंहितेचं उल्लंघन
सध्या, दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर सामन्याचे रेफ्री मनु नायर यांनी दोघांनाही आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. मॉरिसला आचारसंहितेच्या 2.5 आणि हार्दिक पंड्याला आचारसंहितेच्या 2.20 नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं. रेफ्रीने दोन्ही स्टार खेळाडूंना फटकारले आणि पुढील सामन्यात अशी चूक न करण्याचा इशाराही दिला.

मुंबईने मिळवला विजय
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने 164 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईने 19.1 षटकांत 5 गडी गमावून बेंगलोरने दिलेलं लक्ष्य सहजपणे गाठलं.

महत्त्वाच्या बातम्या-

“निवडकर्त्यांनी सूर्यकुमारची खेळी पहिली असावी…” माजी दिग्गजाने निवड समीतीला फटकारले

बंदे मै दम हैं! सुर्यकुमारला मिळाली विरेंद्र सेहवागकडून कौतुकाची थाप

भारतीय संघाची जर्सी घालण्यासाठी सुर्यकुमारने अजून काय करायला पाहिजे? माजी क्रिकेटपटू संतापला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---