---Advertisement---

दोनदा सटकला, शेवटी पकडलाच! फाफच्या विचित्र शॉटवर ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा खतरनाक कॅच, व्हिडिओ लगेच पाहा

On: मंगळवार, मे 9, 2023 9:53 PM
Faf-Du-Plessis-And-Vishnu-Vinod
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023मधील 54वा सामना मंगळवारी (दि. 9 मे) मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने खास विक्रम रचला. तो अशी कामगिरी करणारा आरसीबीचा दुसरा कर्णधार बनला. खरं तर, फाफ या हंगामात भलत्याच फॉर्ममध्ये आहे. तो हंगामात सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज बनला आहे. अशात या सामन्यात मुंबईविरुद्ध वानखेडेच्या खेळपट्टीवर विराट कोहली 1 धावांवर बाद झाल्यानंतर फाफने डाव सांभाळला. तसेच, हंगामातील सहावे अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, यावेळी एक विचित्र फटका मारून तो झेलबाद झाला. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

फाफ डू प्लेसिस झेलबाद
फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याच्या डावाचा शेवट मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज कॅमरून ग्रीन याने 15व्या षटकातील पहिल्या चेंडूवर केला. ग्रीनने फाफला पुढील बाजूस चेंडू टाकला. यावेळी स्कूप मारण्याच्या नादात फाफचा फटका थेट शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेला. यावेळी सब्स्टिट्यूट विष्णू विनोद (Vishnu Vinod) याने शानदार झेल पकडला. हा झेल जसा विनोदकडे गेला, तसा चेंडू त्याच्या हातातून एकदा नाही, तर 2-3 वेळा निसटला. मात्र, शेवटी क्षेत्ररक्षकाने डाईव्ह मारत हा झेल पकडला आणि फाफला तंबूत धाडले.

फाफची वादळी खेळी
फाफ आरसीबीच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आला होता. त्याने खेळपट्टीवर येताच दुसऱ्या षटकापासून फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. मुंबईसाठी दुसरे षटक टाकणाऱ्या पीयुष चावला याला फाफने पहिला चौकार मारला आणि नंतर एक शानदार षटकार मारला. फाफ इथेच थांबला नाही, तर त्याने 41 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या.

फाफने रचला विक्रम
फाफने 65 धावा करताच आरसीबी (RCB) संघासाठी 1000 धावांचा आकडा पार केला. यासह तो आरसीबीसाठी कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली याच्यानंतर दुसरा कर्णधार बनला. फाफ डू प्लेसिस 2022च्या आयपीएल हंगामात आरसीबी संघाशी जोडला गेला होता. त्यानंतर त्याने आतापर्यंत 27 सामन्यात 41.76च्या सरासरीने 1044 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 अर्धशतकांचाही समावेश आहे. (mi vs rcb ipl 2023 faf du plessis wicket video viral see here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फाफने मुंबईविरुद्ध पार केला मैलाचा दगड! भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी अवघ्या 27 सामन्यात दाखवली करून
आधी संघातून स्वत:च झाला बाहेर, आता भारतात वर्ल्डकपमध्ये खेळण्याची इच्छा केली व्यक्त, कोण आहे तो?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---