चेन्नई येथील सामन्याद्वारे भारत आणि इंग्लंड संघामधील बहुचर्चित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर दबाव बनवलेला आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने या सामन्यात शानदार द्विशतक झळकावले, तर भारतीय कर्णधार विराट कोहली मात्र पूर्णतः फ्लॉप राहिला. रुटच्या या खेळीचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे. याचवेळी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक खळबळजनक वक्तव्य करत रुटला फिरकीविरुद्ध विराटपेक्षा उत्तम फलंदाज मानले आहे.
रुटने पहिल्या डावात 377 चेंडूत 19 चौकार व 2 षटकारासह 218 धावांची शानदार खेळी केली. तर विराटने केवळ 11 धावा केल्या. यानंतर वॉन यांनी ट्विटर वर लिहिले, “जो रूटची स्पिन विरुद्ध सरासरी 70.7 ची आहे. तर विराटची सरासरी 69.0 आहे. मात्र ऑफ स्पिन विरुद्ध रूटची सरासरी 71.2 आहे. आणि विराटची केवळ 53.1. यातून स्पष्ट होते की रूट हा स्पिन विरुद्ध विराटपेक्षा उत्तम फलंदाज आहे.’ वॉन यांच्या या वक्तव्याबद्दल अनेक भारतीय क्रिकेट रसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान सामन्याचा विचार केला असता तिसरा दिवस देखील इंग्लडच्या बाजूने झुकला. दिवसअखेर भारताने आपल्या डावात 6 गडी गमावत 257 धावा केलेल्या आहेत. भारताकडून केवळ रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांनी काहीसा संघर्ष केला. पंतने 91 तर पुजाराने 73 धावांची खेळी केली. भारतीय संघ इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येपासून अजूनही 321 धावांनी पिछाडीवर आहे.
तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव गाजवला तो कर्णधार जो रुटने. रुटने 218 धावांची शानदार खेळी केली.त्याला डॉम सिबली (87) व बेन स्टोक्सने(82) उत्तम साथ दिली.दरम्यान भारतीय संघाची पुढील वाट अतिशय खडतर मानली जात आहे.भारताला पराभव टाळण्यासाठी सामन्याच्या चौथ्या दिवशी अविश्वसनीय कामगिरी करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : हैदराबाद-नॉर्थईस्ट युनायटेडची गोलशून्य बरोबरी
अरेरे! चेतेश्वर पुजारा झाला दुर्दैवी पद्धतीने बाद, पाहा व्हिडिओ
अबुधाबी टी१० लीग : दिल्ली बुल्सवर मात करत नॉदर्न वॉरियर्सने पटकावले विजेतेपद






