---Advertisement---

२० युरोंसाठी तो क्रिकेटच्या मैदानात थेट नागडा घुसला, पुढे…

On: शुक्रवार, ऑगस्ट 7, 2020 11:31 AM
---Advertisement---

आज काल क्रिकेटच्या मैदानासह अन्य खेळांच्या मैदानावर सामना सुरु असताना प्रेक्षकांकडून अनेक असभ्य कृती आपण पाहतो.

गेल्या काही काळात क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरु असताना प्रेक्षकांमधून एखादी व्यक्ती नग्न होऊन मैदानात घुसून सामन्यात व्यत्यय आणल्याचे आपण पाहिले असेल. मात्र या गोष्टीचा इतिहास ४५ वर्षे जुना आहे.

क्रिकेट मैदानावर सर्वात प्रथम नग्न होत खेळात व्यत्यय आणण्याचा प्रकार मायकेल अँग्लो नामक व्यक्तीने  4 ऑगस्ट 1975 रोजी लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्याती ऍशेस कसोटी मालिकेतील एका सामन्यात केला होता.

पेशाने मर्चंट नेव्हीमध्ये कुक असलेल्या मायकेल अँग्लोने 20 युरोंची पैज जिंकण्यासाठी हे कृत्य केले होते असे त्याने नंतर सांगितले होते.

त्यावेळी मायकेल अँग्लोला त्याच्या या कृतीसाठी 20 युरोंचा दंड झाला होता. गेल्या काही वर्षात मैदानावर कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही अशा घटना घडत आहेत मात्र त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment