---Advertisement---

ब्रेसवेलची ऐतिहासिक कामगिरी! शेवटच्या षटकात २४ धावांसह न्यूझीलंडला मिळवून दिला विजय

michael-bracewells
---Advertisement---

न्यूझीलंडने आयर्लंडविरुद्ध १० जुलैला झालेल्या पहिल्या वनडेत १ विकेटने रोमांचकारी विजय मिळवला. आयर्लंडने न्यूझीलंडसमोर ३०१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला अखेरच्या षटकार २० धावांची गरज होती.

अशा परिस्थितीत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मायकल ब्रेसवेलने ५० व्या षटकातील ५ चेंडूतच ३ चौकार आणि २ षटकार ठोकत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. त्याने ८२ चेंडूत १२७ धावांची शतकी खेळी केली. त्याच्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५० व्या षटकात एखाद्या संघाने २० पेक्षा अधिक धावा करत सामना जिंकला आहे. यापूर्वी १९८७ साली इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या षटकात १८ धावा करत विजय मिळवला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

(ही बातमी ९० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---