२०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार मायकेल क्लार्क पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्लार्क ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर पिप एडवर्डसबरोबर दिसला आहे. रिपोर्ट्सनुसार क्लार्क आणि पिपचे अफेअर चालू आहे. नुकताच क्लार्कचा आपल्या पत्नीबरोबर घटस्फोट झाला आहे आणि गेल्या दोन महिन्यांपासून तो पिपला डेट करत आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार क्लार्क (Michael Clarke) फॅशन डिझायनर पिपसमवेत (Pip Edwards) बॉन्डी बीचवर दिसला गेला आहे. त्यात ४० वर्षीय पिपने क्लार्कला मिठीत घातलेले दिसले आहे. क्लार्क एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तेथे त्याने पिपच्या १३ वर्षाच्या मुलाचीही भेट घेतली.
Michael Clarke and Pip Edwards: Rumoured couple step out in Rose Bay https://t.co/p0jbrR0Bi2 pic.twitter.com/WBwjXDniEv
— lex scripta esq (@lexscriptaesq) March 24, 2020
क्लार्कचे बर्याच स्त्रियांशी संबंध होते. यापूर्वी मिडियामध्ये त्याच्याविषयी बातम्या आल्या होत्या की त्याचे संबंध त्याची असिस्टंट साशा आर्मस्ट्राँगशी(Sasha Armstrong) आहेत. साशा क्लार्कच्या क्रिकेट ऍकॅडमीचे कामकाज पहाते. साशा आणि क्लार्कचा फोटो मीडियामध्ये लीक झाला होता. त्यामध्ये ते दोघेही लक्झरी नौकात बसलेले होते. क्लार्कने २०१२ मध्ये एक बिझनेस विमेन आणि मॉडेल काइली बोलडीशी(Kyly Boldy) लग्न केले होते. पण त्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा वाढला. आणि त्यानंतर क्लार्कने घटस्फोट घेतला.
'They have nothing to hide': Michael Clarke and Pip Edwards 'go public' as they stroll around Sydney Harbour six months after his split from wife Kyly – https://t.co/STjnssiCZZ pic.twitter.com/MRLHsyxHpt
— Benbeezy_™️ (@Benbeezy_) March 23, 2020
नुकतेच क्लार्कने एक अतिशय खळबळजनक विधान केले होते. ते ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये खूपच प्रसिद्ध झाले होते. क्लार्कने असा दावा केला आहे की भारत ऑस्ट्रेलिया २०१८ मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल करार टिकवण्यासाठी भारतीय खेळाडूंविरूद्ध स्लेजिंगचा वापर करीत नव्हते.
परंतू ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आणि टी२० कर्णधार अॅरोन फिंच(Aaron Finch) याने हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले आहे.
फिंच म्हणाला की स्मिथ(Steve Smith) आणि वॉर्नर(David Warner) संघातून बाहेर गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्वीसारखा राहिला नव्हता. आणि त्यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा मजबूत होता.






