टी२० क्रिकेट हा गेल्या दशकभरात क्रिकेटचा सगळ्यात लोकप्रिय प्रकार म्हणून नावारूपाला आला आहे. मात्र आजही असे कित्येक क्रिकेटपटू आहेत, ज्यांना या टी२० क्रिकेटपासून लांब राहिलेले आवडते. त्यांचा अजूनही विश्वास कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटवर आहे. वेस्ट इंडीजचे पूर्व क्रिकेटर मायकल होल्डिंग हे सुद्धा या गोष्टीला मानतात. त्यांच्या मते टी२० क्रिकेट हे खरे क्रिकेट नाही.
वेस्ट इंडीज संघाचे माजी महान खेळाडू होल्डिंग यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, “वेस्ट इंडीजचे बहुतांश खेळाडू देशासाठी खेळण्यात रस दाखवत नाही. जेव्हा तुम्ही सहा ते आठ लाख डॉलर सहा आठवड्यात कमवत असाल तर, तुम्ही काय कराल? मी या गोष्टीमध्ये खेळाडूंना दोषी नाही ठरवत आहे तर, या खेळाच्या प्रेक्षकांना दोषी ठरवतो आहे. वेस्ट इंडीजचा संघ टी२० स्पर्धा भलेही जिंकेल पण, ते खरे क्रिकेट नाही आहे.”
मायकेल होल्डिंग हे आपल्या काळातील एक दिग्गज क्रिकेटपटू तर होतेच. मात्र निवृत्तीनंतर त्यांनी समालोचनाच्या क्षेत्रात देखील भरपूर नाव कमावले. अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात ते समालोचन करतांना दिसून येतात. मात्र अद्याप जगातील सगळ्यात लोकप्रिय टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये आजवर त्यांनी एकदाही समालोचन केले नाही.
त्यामुळे साहजिकच होल्डिंग यांना यावेळी ‘आयपीएलमध्ये तुम्ही समालोचन करताना कधी दिसणार?’, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी लगेच उत्तर दिले की, टी२० सामने म्हणजे खरे क्रिकेट नाही. त्यामुळेच ते कुठल्याही टी-२० मालिका किंवा स्पर्धेत समालोचन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. वेस्ट इंडीज संघादर्जा खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे टी-२० सामने आहेत, असा आरोपही होल्डिंग यांनी यावेळी केला.
होल्डिंग यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदावर सुद्धा भाष्य केले. त्यांनी सांगितले, “कोहलीला आपला अति राग कमी करणे गरजेचे आहे. कारण त्याचा परिणाम संघावर होतो. कोहलीने असे केल्यास संघ अधिक शांतपणे खेळू शकतो.”
होल्डिंग यांनी त्यांचा वेळेचा भारतीय संघ आणि आत्ताचा भारतीय संघ यामध्ये तुलना करताना सांगितले की, “दोन्ही काळ खूप वेगळे आहेत. त्यावेळेस केवळ एक-दोन खेळाडू तंदुरुस्त असायचे आणि आज बघा पूर्ण संघ तंदुरुस्त आहे. भारतीय संघाच्या खेळात काही एवढा बदल झाला नाही परंतु,सध्या सगळे खेळाडू एथलेटिक वाटतात. त्यांचा तंदुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे त्यांच्या खेळाचा स्तर वाढला आहे.”
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ: धक्कादायक! श्रीलंकन खेळाडूंची बायो बबलचे नियम तोडून इंग्लंडच्या रस्त्यांवर मजा
बाजीगर! गोष्ट पाच तासांत तीन सुवर्ण जिंकणाऱ्या दीपिका कुमारीची
देशाचे दुर्दैव! आशियाई सुवर्णपदक विजेता खेळाडू विकतोय चहा