इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांच्यावर टिका केली आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कर्णधार जो रूटला बाऊन्सर रणनीतीपासून रोखण्याचा प्रयत्न न केल्याने वॉनने संघ प्रशिक्षकाला जबाबदार ठरवले आहे. लॉर्ड्स कसोटीत पाचव्या दिवशी इंग्लंड खूप मजबूत स्थितीत होता. पण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी 9 व्या विकेटसाठी 89 धावांची विक्रमी भागीदारी करत भारताला 271 धावांची आघाडी मिळवून दिली. प्रत्युत्तरात इंग्लंड 120 धावांवर बाद झाला आणि 151 धावांनी त्यांचा दारुण पराभव झाला.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीत आपले मत व्यक्त करत म्हटले आहे की, “दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या 20 मिनिटे आधी इंग्लड संघाच्या पतनाला सुरुवात झाली होती. त्या दरम्यान मी इंग्लंडची सर्वात वाईट कामगिरी पाहिली. जसप्रीत बुमराहला बाऊन्सर टाकण्याच्या प्रयत्नात इंग्लंडने सामना कसा गमावला याबद्दल बरेच काही लिहिले आणि बोलले गेले आहे.”
“अर्थात, जो रूटला संघातील इतर वरिष्ठ खेळाडूंनी सांगत लवकर हस्तक्षेप करायला हवा होता. पण माझ्या मते प्रशिक्षकांची भूमिका यात महत्वाची होती. त्यांच्या वतीनेही काहीतरी हालचाल होणे अपेक्षित होते. प्रशिक्षक सिल्व्हरवूडने एखाद्या खेळाडूला ड्रिंक घेऊन मैदानात का पाठवले नाही? रूटला का विचारले नाही की काय चालले आहे हे? आणि त्याला त्याची रणनीती बदलण्यास का सांगितले नाही? मला अजून आठवते की, जर मी मैदानावर असे काही करायचो तर तर डंकन फ्लेचरने माझ्यासोबत असेच करायचे,” असेही तो म्हणाला.
मायकेल वॉन पुढे म्हणाला की, “सिल्व्हरवूडने या पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना विशेषत: जेम्स अँडरसनला भरपूर बाऊन्सर टाकले होते. नंतर जेव्हा बुमराह फलंदाजीला आला, तेव्हा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनीही त्याला भरपूर बाऊन्सर टाकले. वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि यष्टीरक्षक जोस बटलरनेही त्याच्यासोबत वाद घातला. मात्र, बुमराह आणि शमीने भारताचा स्कोअर 209 वरून 298 पर्यंत नेला आणि भारतीय संघाने डाव घोषित केला.”
महत्त्वाच्या बातम्या-
शून्य अनुभव असूनही ‘विराटसेना’ करणार लीड्स कसोटी फत्ते! गाळतेय भरपूर घाम
पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी होल्डरचा डावपेच, मुद्दाम छेड काढत ‘अशी’ घेतली विकेट
‘हिटमॅन’ रोहित षटकारांच्या विक्रमात दिग्गज कपिल देव यांना पछाडणार, ठोकावा लागणार फक्त…