इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारतीय संघाविषयी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आणि चर्चेत आला आहे. आगामी वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे आणि वॉनने या विश्वचषकाविषयी भविष्यवाणी केली आहे. वॉनच्या मते भारतीय संघ आघामी विश्वचषक जिंकण्याासठी दावेदार आहे, पण यासाठी त्याला अधिक आक्रमकता दाखवावी लागेल.
एका मुलाखतीत मायकल वॉन (Michael Vaughan) म्हणाला, “खरोखर, तुम्ही म्हणाला भारत विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. कारण यावेळी विश्वचषक बारतात होणार आहे. पण फलंदाजीमध्ये त्यांनी अधिक आक्रमकता दाखवली पाहिजे. गोलंदाजीत भारतीय संघ आक्रमकता दाखवत आहे. फलंदाजीत असे होत नाहीये. संखापुढे असलेला हा एक मोठा प्रश्न आहे. अनुकडच्या काळात त्यांनी आक्रमक दृष्टीकोण दाखवला आहे. संघाने पुढेही असेच प्रदर्शन केले पाहिजे.”
इंग्लंडचा माजी कर्णधार पुढे म्हणाला, “भारतीय संघाकडे चांगली गुणवत्ता आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत, पण मागच्या अनेक वर्षांपासून भारतीय संग व्हाईट बॉल चॅम्पियन बनला नाहीये. मला वाटते, यावर्षी मायदेशात आपल्या लोकांपुढे भारतीय संघ दबाव कसा पेलतो, यावर बऱ्याच गोष्टी अपलंबून आहेत.” भारतीय संघ विश्वचषक विजयासाठी दावेदार असला, तरी वॉनने मात्र विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंड संघावर दावा ठोकला आहे.
विश्वचषक जिंकण्याासठी वॉनने लावला ठोकला इंग्लंडवर दावा –
“इंग्लंड संघाकडे काही चांगले पर्याय आहेत. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत, जे चांगल्या पद्धतीने चेंडू स्पिन करू शकतात. त्यांच्याकडे वेगवान गोलंदाज आहेत, जे विरोधी फलंदाजांवर गुडघे टकण्याची वेळ आणतात. जोफ्रा आर्चर संघात परतणे ही मोठी बाब आहे. तसेच मार्क वुड 90 मैल ताशी गतीने चेंडू टाकत आहे. त्यामुळे मला वाटते इंग्लंडकडे आनुभव आहे आणि संघ विश्वचषक जिंकू शकतो. फक्त भारताकडून त्यांना धोका असेल,” असे वॉन पुढे म्हणाला.
(Michael Vaughan feels that England along with India are strong contenders to win the World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयी भव! मुंबईचा बेंगलोरवर 4 विकेट्सने विजय, गुणतालिकेत पुन्हा पटकावले अव्वलस्थान
IND vs AUS । मिचेल स्टार्कविरुद्ध खास रणनीतीसह उतरणार रोहित आणि कंपनी, वाचा सविस्तर





