भारत आणि इंग्लंड यांच्यात जानेवारी ते मार्च 2024 मध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला अजून काही महिन्यांचा वेळ आहे. पण सोमवारी (11 डिसेंबर) भारत दौऱ्यासाठी इंग्लंडचा 16 सदस्यीय संघ घोषित केला गेला. यात तीन युवा खेळाडूंना पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात निवडले गेले आहे. इंग्लंड संघ आपल्या बॅझबॉल रणनीतीच्या जोरावर भारत दौरा गाजवणार, असे अनेकांना वाटत आहे. पण अशातच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने त्यांच्या खेळाडूंना चेतावनी दिली.
इंग्लंड कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम (Brendon McCullum) संघासोबत जोडला गेल्यानंतर बॅझबॉल ही संकल्पना उदयाला आली. कसोटी क्रिकेटमध्ये मारझोड फलंदाजी करणारा इंग्लंड संघ यामुळे सर्वांना पाहायला मिळाला. मागच्या एका वर्षापेक्षा अधिक काळापासून ही रणनीती इंग्लंड संघासाठी फायदेशीर देखील ठरली. असे असले तरी, माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याच्या मते भारतात बॅझबॉल रणनीती चालेल, याची शक्यता फार कमी आहे. भारतातील फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टी आणि भारतीय फिरकीपटू इंग्लंडला उध्वस्थ करू शकते.
यावर्षी ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नेथन एलिस याने इंग्लंड संघाला अक्षरशः गुडघ्यावर आणले होते. फिरकी गोलंदाजीविरुद्ध इंग्लंडचे फलंदाज कशा प्रकारे चूक करतात ही आठवण मायकल वॉनने पुन्हा एकदा करू दिली. माजी कर्णधार म्हणाला, “भारतात क्रिकेट खेळणे सर्वात कठीण आहे. ऍशेस (2023) पाहिली, तर नेथन लायन फिट होता आणि चांगली गोलंदाजीही करत होता. ऑस्ट्रेलियन संघ 2-0ने पुढे होता. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात काहीच षटकांचा खेळ झाला होता आणि लायन चांगली गोलंदाजी करत होता. पुढच्याच आठवड्यात तो म्हणाला बॅजबॉलविरुद्ध त्यांचा संघ 2-0ने पुढे आहे. आपण फक्त एका स्पिनरची चर्चा करत आहोत, पण तुम्ही एजबस्टनमध्ये त्याने घेतलेला फाइव विकेट हॉल पाहिला, तर तो इंग्लंडचे फलंदाज चुकीचे शॉट्स खेऊन बाद झाले होते.”
इंग्लंड संघाला भारतात येणाऱ्या अडचणींची कल्पना मायकल वॉन यांनी आधीच संघाला दिली. वॉन म्हणाला, “फिरकीसाठी अनुकूल रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची गोलंदाजी खेळताना तुमचे डोके ठिकाण्यावर राहणार नाही. संघ उद्ध्वस्थ होऊ शकतो. इंग्लंड संघ तिथे जाईल आणि बॅझबॉल पद्धतीने खेळेल, कारण याविषयीची चर्चा झाली आहे. भारतात त्यांना अशाच पद्धतीने यश मिळवायचे आहे. हे प्रदर्शन पाहताना मजा येईल, पण त्याआधी तुमच्या संघात तीन चांगले फिरकीपटू पाहिजेत.”
दरम्यान, मॅक्युलम प्रशिक्षक बनल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने इंग्लंडला मागच्या 18 पैकी 13 कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला आहे. या सर्व सामन्यांमध्ये इंग्लंड संघ बॅझबॉल रणनीती अमलात आणून क्रिकेट खेळताना दिसला. (Michael Vaughan has warned the England team ahead of the tour of India for the Test series)
भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेला इंग्लंड संघ –
बेन स्टोक्स (कप्तान), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हैरी ब्रुक, जैक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जैक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट और मार्क वुड.
महत्वाच्या बातम्या –
विराट की बाबर, कोणाचा कव्हर ड्राइव्ह भारी? अफगाणिस्तान फलंदाजाने घेतले ‘या’ खेळाडूचे नाव
‘मी संघात माझे नाव…’, इंग्लंड कसोटी संघाच्या घोषणेनंतर स्टुअर्ट ब्रॉडची लक्षवेधी प्रतिक्रिया