इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या सलामी जोडीची तुलना सचिन तेंडुलकर विरेंद्र सेहवागच्या सलामी जोडीशी केली आहे. पाचव्या टी-20 मध्ये विराटने घेतलेल्या सलामीच्या निर्णयाला ‘मास्टरस्ट्रोक’ सांगताना त्या दोघांचे त्यांनी कौतुक केले.
केएल राहुलने सलग चार टी-20 डावात सलामी फलंदाजी केली; परंतु त्याला उत्तम कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पाचव्या सामन्यात कोहलीने रोहित शर्माबरोबर सलामी फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी 9 षटकांमध्ये 94 धावा करत संघाला धमाकेदार अशी सुरुवात करून दिली.
क्रिकबझशी संवाद साधताना मायकल वॉन म्हणाले की, “हे दोघे सचिन आणि सेहवाग जसे दिसत होते तशीच फलंदाजी करताना मला दिसले. म्हणजेच सेहवाग मैदानात जाऊन पहिल्या चेंडूवरती उघडपणे शॉर्ट्स मारत असे, कारण सचिन दुसर्या टोकाला आहे हे त्याला ठाऊक असायचे. सचिनचा फलंदाजी करतानाचा स्ट्राइक रेट नेहमीच चांगला असायचा. कारण त्याच्याकडे ऑफ साईड, ऑन-साइड, फ्रंट-फूट, बॅक-फूट यासारखे अनेक चांगले पर्याय होते आणि विराटही भारतासाठी असेच काही करत आहे.”
पुढे वॉन म्हणाले की, “सूर्यकुमारने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केल्यामुळे विराटला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात आला असावा. पण मला वाटते की त्यांचा हा निर्णय उपयोगी ठरला. सूर्यकुमार यादव तिसर्या क्रमांकावर चांगला खेळल्यामुळे मला वाटते की, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णतः तयार झाला आहे. त्यामुळे विराटने सलामी फलंदाजी केली पाहिजे, कारण आपण चौथ्या क्रमांकावर त्याला खेळवू शकत नाही. आता भारताचे अव्वल तीन फलंदाज धोकादायक दिसत आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
विराटसोबत ओपनिंग करण्याबद्दल विचारल्यावर रोहितने सोडले मौन; म्हणाला, ‘आम्ही शेवटपर्यंत…’
पुणेरी पाहुणचार! वनडेसाठी पुण्यात आलेली टीम इंडिया ‘या’ अलिशान हॉटेलमध्ये करतेय विश्रांती
मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर ‘या’ खेळाडूंचे IPLमध्ये शानदार प्रदर्शन; एक तर ठरला ‘मॅच विनर’