आयपीएल 2023मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स असा खेळला गेला होता. या सामन्यात मोठा वाद पाहायला मिळालेला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली, लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज नवीन उल हक व लखनऊचा मेंटर गौतम गंभीर हे या वादाच्या केंद्रस्थानी होते. या वादावर सातत्याने समीक्षक प्रतिक्रिया देत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने आता या मुद्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने कमी धावसंख्येचा बचाव करत शानदार विजय मिळवला. मात्र सामन्या दरम्यान विराट कोहली व नवीन उल हक यांच्या दरम्यान बाचाबाची झाली होती. सामना संपल्यानंतर हातमिळवणी करताना देखील या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लखनऊचा मेंटर गौतम गंभीर याने देखील या वादात उडी घेत विराटसोबत हुज्जत घातली होती. हे प्रकरण चिघळल्याने दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अंगावर गेले. या संपूर्ण प्रकरणामुळे आयपीएल व सर्व खेळाडूंची मोठ्या प्रमाणावर नाचक्की झाली. मॅच रेफ्रींंनी गंभीर व विराट यांच्यावर शंभर टक्के मॅच फी कपातीची कारवाई केली. तर, नवीनला 50 टक्के मॅच फी इतका दंड आकारला गेलेला.
याप्रकरणी बोलताना वॉन म्हणाला,
“खेळाडूंमध्ये मैदानावर छोटे-मोठे वाद होत असतात. ते वाद त्यांनीच सोडवायला हवे. अशावेळी प्रशिक्षक किंवा कोचिंग स्टाफमधील कोणीही मध्यस्थी करता कामा नये. तुमचे काम केवळ खेळाडूंना मार्गदर्शन करणे आहे.”
या घटनेनंतर विराट व नवीन यांच्या दरम्यान इन्स्टा वॉर देखील झालेले. विराटने आपल्यावर झालेल्या कारवाईबद्दल लिहून आपण निर्दोष असल्याचे सांगितले होते.
(Michael Vaughan Said No Need Of Coaching Staff Interfare In Players Fight)
महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुबमनचा दरारा! आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो नाहीतर आयपीएल, धावांचा पाडतोय पाऊस
रहाणेनंतर साहाला मिळणार का सेंकड चान्स? WTC फायनलआधी चर्चेला आला ऊत