जगभरातील क्रिकेटप्रेमींसह आजी-माजी क्रिकेटपटू व समीक्षकांना प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे वेध लागले आहेत. अनेक जण आपल्या ब्लॉगवर सोशल मीडिया खात्यावरून याबाबत भविष्यवाणी करताना दिसतायेत. यासोबतच त्यानंतर होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या हायप्रोफाईल कसोटी मालिकेची देखील चर्चा रंगू लागली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने नुकताच या मालिकेतील संभाव्य विजेत्याबाबत अंदाज व्यक्त केला.
ड्युक चेंडूचा या संघाला होणार फायदा
आपल्या क्रिकेट समिक्षणासाठी प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने नुकतीच एका क्रिकेट संकेतस्थळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आगामी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेबाबत बोलताना म्हटले, “मला विचाराल तर या मालिकेचा संभाव्य विजेता म्हणून मी इंग्लंडला पसंती देईन. या मालिकेत वापरण्यात येणाऱ्या ड्युक चेंडूमुळे मी इंग्लंडच्या पारड्यात माप टाकले. हा चेंडू वापरल्यावर इंग्लंड अगदी कमी वेळा सामने हरला आहे. तसेच, भारताचा कर्णधार विराट कोहली व इंग्लंडचा कर्णधार जो रूट या मालिकेत सर्वाधिक धावा तर, जसप्रीत बुमराह व ख्रिसस वोक्स सर्वाधिक बळी मिळवतील.”
या दोघांचा खेळ पाहण्यास उत्सुक
वॉनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याविषयी बोलताना म्हटले, “जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये भारताचा रिषभ पंत व न्यूझीलंडचा कायले जेमिसन यांचा खेळ पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. जेमिसनने नुकतीच कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली आहे तर, पंत सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्टार आह. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध त्याने अफलातून कामगिरी केली.”
भारताविषयी करत असतो टीकाटिप्पणी
मायकल वॉन सातत्याने भारतीय क्रिकेट संघावर टीका करत असतो. त्याच्या या वागण्यामुळे अनेकदा तो भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर येतो. वॉन आपल्या क्रिकेट कारकिर्दी दरम्यान इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला होता. सध्या तो समालोचक म्हणून काम करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या लाडक्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागणार ‘या’ दिवसाची प्रतिक्षा
‘त्या’ काळात मी आठ-नऊ दिवस न झोपता सामने खेळत होतो, अश्विनचा धक्कादायक खुलासा
“एकाच वेळी भारताचे तीन दर्जेदार संघ खेळू शकतात”, पाकिस्तानच्या दिग्गजाकडून कौतुक