ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला 2-0 ने पराभूत करून मालिका आपल्या खिशात घातली.
ऑस्ट्रेलियन संघाच्या या विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने म्हटले आहे की सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघाला त्याच्या घरात पराभूत करणे ही सर्व संघांसाठी सोपी गोष्ट नाही, परंतु फक्त भारतीय संघच त्यांना त्यांच्या मायदेशात पराभूत करू शकतो.
ऍडिलेड कसोटीत पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर मायकेल वॉनने ट्विट केले की, ‘या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा हा संघ अनेकांना पराभूत करणार आहे. या परिस्थितीत केवळ भारतीय संघाकडे अशी शस्त्रे आहेत ज्यामुळे ते ऑस्ट्रेलियाला पराभूत करू शकतील.’
This Australian Team in these conditions are going to take some beating … Only @BCCI #India have the tools to do so at this stage imo … #AUSvPAK
— Michael Vaughan (@MichaelVaughan) December 2, 2019
एका वर्षाच्या बंदीनंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनमुळे ऑस्ट्रेलियचा संघ आणखी मजबूत झाला आहे.
त्यांच्या कसोटी संघातील पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलियाने पहिले अॅशेस जेतेपद कायम राखले. त्यानंतर आता पाकिस्तानला घरच्या मैदानावर 2-0 ने पराभूत केले. वॉर्नर, स्मिथबरोबर ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लाबुशाने शानदार कामगिरी करत आहे. याव्यतिरिक्त, मिशेल स्टार्कच्या नेतृत्वात त्याची गोलंदाजीही अधिक धोकादायक बनली आहे.
ऍडिलेड येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानला एक डाव आणि 48 धावांनी पराभूत केले. या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने तीन विकेट्सच्या मोबदल्यात 589 धावा करून पहिला डाव घोषित केला.
या दरम्यान डेव्हिड वॉर्नरने नाबाद 335 धावांची खेळी केली आणि मार्नस लाबुशानेने 162 धावांची शानदार खेळी खेळली.
रणजी ट्रॉफी: पहिल्या सामन्यासाठी मुंबई संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाले संघात स्थान
वाचा????https://t.co/8sA0lN62Yy????#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #Cricket— Maha Sports (@Maha_Sports) December 4, 2019
…म्हणून बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकणाऱ्या मेस्सीच्या मुलाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
वाचा????https://t.co/DqnHLrSdbb????#म #मराठी #Football @Mazi_Marathi @BeyondMarathi #BallonDor2019 #LionelMessi— Maha Sports (@Maha_Sports) December 3, 2019






