ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळांडूमध्ये शाब्दीक युद्ध सुरु झाले आहे. तसेच आता क्रिकेटमधील अनेक दिग्गज या मालिकेबाबत त्यांची मते व्यक्त करत आहेत.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही ट्विटरवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघामधील कसोटी मालिकेचा महत्त्वपूर्ण भाग असणार आहे, असे म्हटले आहे.
You get the feeling @imVkohli is going to be the difference between the 2 teams over the new few weeks ….. #AusvInd
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 25, 2018
कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात नाबाद 61 धावांची वादळी खेळी करत सामना जिंकून दिला. यामुळे तो या आगामी कसोटी मालिकेत नक्कीच महत्त्वाची भुमिका पार पाडेल. तर त्याला आम्ही धावा करण्यापासून रोखण्यास तयार आहोत असे मत ऑस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरेने म्हटले आहे
तसेच ऑस्ट्रेलियाने भारताला 4-0 असे पराभूत केले आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका बरोबरीत सुटली तर त्यांना आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर येण्याची संधी आहे. तर भारत 116 गुणासंह पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–या कारणामुळे टीम इंडियाला कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान
–टीम इंडियातून वगळल्यानंतर एमएस धोनी झाला या खेळाच्या स्पर्धेत सामील
–तब्बल ५५ वर्षांनंतर पुन्हा घडला तो इतिहास