इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ मध्ये विराट कोहलीचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. त्याने संघासाठी चालू हंगामातील १६ सामन्यांमध्ये २२.७३ च्या सरासरीने ३४१ धावा केल्या आहेत. विराटचे हे आकडे चाहत्यांसाठी समाधानकारक नाहीत. क्रिकेटचे अनेक जाणकार त्याला नेहमी सल्ले देताना दिसत आहेत. अशात आता इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन देखील व्यक्त झाले आहेत.
आयपीएल २०२२ मध्ये विराट कोहली (Virat Kohli) फक्त दोन अर्धशतक करू शकला आहे. यादरम्यान देखील त्याच्या स्ट्राईक रेट चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराटला क्रिकेटमधून काही काळाची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. शुक्रवारी (दि. २७ मे) हंगामातील दुसऱ्य क्वालिफायर सामन्यात विराट पुन्हा अपयशी ठरला आणि यानंतर मायकल वॉन (Micheal Vaughan) यांच्याकडून देखील त्याला हाच सल्ला मिळाला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात विराट अवघ्या ७ धावा करून तंबूत परतला.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना मायकल वॉन म्हणाले की, “विराट कोहली महान खेळाडू आहे आणि तो एका अशा काळातून जात आहे, जे सोपा नाहीये. दोन-तीन वर्षांपूर्वी तुम्ही टीव्ही चालू केला किंवा मैदानात सामना पाहण्यासाठी गेलात, तर माहिती पडायचे की, विराट कोहली शतक करू शकतो. तो त्या काळातून गेला आहे, जेव्हा प्रत्येक सामन्यात असे वाटायचे की, तो शतक करणार आहे. हे क्रिकेट आहे आणि गरजेचे नाही की, तुमची प्रत्येक वेळ तशीच असावी, जशी आधी होती.”
“फक्त एका विश्रांतीची गरज आहे, जा आणि आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालव. त्यानंतर इंग्लंडच्या विमानात स्वार हो आणि त्याठिकाणी जाऊन चेंडूला मारायला सुरुवात कर. विराटसाठी हा कठीण काळ आहे आणि तो फॉर्ममध्ये येण्यासाठी खूप मेहनत करत आहे. मला वाटते की, सध्या त्याने बॅट बॅगमध्ये पॅक केली पाहिजे आणि कुटुंबासोबत बसले पाहिजे पाहिजे. यादरम्यान त्याने प्रत्येक गोष्ट, जसे की जाहिरात वगैरे अशा गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. फक्त या गोष्टींपासून दूर हो. काही आठवडे चील कर आणि त्यानंतर जेव्हा तो बॅट उचलेल, तेव्हा तरोताजा झालेला असेल,” असेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, आयपीएलनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी-२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने आणि नंतर इंग्लंड दौऱ्यासाठी संघ रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत विराट, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी विश्रांती दिली गेली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिकडे आई आजारी, पण राजस्थानला चॅम्पियन बनवण्यासाठी झुंज देतोय ‘हा’ खेळाडू, खुद्द प्रशिक्षकाचा खुलासा
एबी डिविलियर्सचा खरा वासरदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसच्या यशाची गोष्ट