इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स आगामी वनडे विश्वचषक खेळणार आहे. मागच्या वर्षी स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच त्याने ही निवृत्ती मागे देखील घेतली आहे. स्टोक्स संघात परतल्यामुळे इंग्लंड संघ भक्कम झाला आहे. मात्र, त्याच्या या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन याने त्याच्यावर टीका देखील केली होती. त्यावर आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने प्रत्युत्तर दिले आहे.
स्टोक्सने पुनरागमन केल्यानंतर पेन म्हणाला होता की, “बेन स्टोक्स हा अगदी स्वार्थी आहे. तो फक्त मोठ्या स्पर्धांमध्ये खेळणार. त्याला वाटेल तेव्हा निवृत्ती घेणार आणि पुनरागमन करणार. बाकी वर्षभर ज्या खेळाडूंनी मेहनत घेतली त्यांना संघाबाहेर केले जाणार.”
त्याच्या या वक्तव्यावर ट्विट करत वॉन म्हणाला, “बेन स्टोक्स हा मी पाहिलेला सर्वात निस्वार्थी क्रिकेटपटू आहे. तो नेहमीच संघाला स्वतःच्या आधी ठेवतो. बाकी टीमकडून ही हास्यास्पद प्रतिक्रिया आली आहे.”
बेन स्टोक्स याने मागील वर्षी जुलै महिन्यात वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो फक्त कसोटी व टी20 क्रिकेट खेळताना दिसला. इंग्लंडला दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला. स्टोक्स याला भारतात क्रिकेट खेळण्याचा मोठा अनुभव आहे. तो मागील 7 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच आयपीएल खेळण्यासाठी भारतात येतोय. त्याच्या याच अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी इंग्लंडच्या वनडे संघाचा कर्णधार जोस बटलर याने त्याला आपली निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली होती.
(Michael Vaughan Speaks On Tim Paine Comment On Ben Stokes Retirement)
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकाची संधी हुकल्यानंतर ब्रूकची रिऍक्शन! म्हणाला, ‘स्टोक्स संघात आल्यामुळे मला…’
कारकिर्दीची सुरुवात अप्रतिम करणाऱ्या तिलकच्या नावावर नकोसा विक्रम, ‘या’ यादीत जोडले गेले नाव






