इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि भारताचा माजी कसोटी सलामीवीर वसीम जाफर नेहमी एकमेकांना ट्रोल करत असतात. त्यांची सोशल मीडियावरील जुगलबंदी नेहमी चर्चेत असते. इंग्लंडच्या पराभवानंतर जाफर इंग्लंडच्या या माजी खेळाडूला ट्रोल करतो. तर, भारताच्या पराभवानंतर वॉनही जाफरची खिल्ली उडवतो. मायकेल वॉनने रविवारी (11 ऑगस्ट) वसीम जाफरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता जाफर याने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
वसीम जाफरने सोशल मीडिया X वर एक प्रश्नोत्तर सत्र आयोजित केले होते. त्याने #AskWasim द्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले की, ते यावेळी त्याला कोणताही प्रश्न विचारू शकतात. जेव्हा मायकेल वॉनने हे पाहिले तेव्हा त्याने वसीम जाफरची पोस्ट टॅग केली आणि विचारले, ‘हाय वसीम. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेचा निकाल काय लागला? मी बाहेर होतो आणि मला ते आठवत नाही. आशा आहे की सर्व काही ठीक असेल.’
त्याच्या या प्रश्नावर जाफर याने उत्तर देताना म्हटले, ‘मी तुला हे ऍशेसच्या भाषेत सांगतो मायकेल. भारताने या मालिकेत तितकेच सामने जिंकले जितके इंग्लंडने मागील 12 वर्षात ऑस्ट्रेलियात जिंकले आहेत.’
I’ll put it in Ashes terms for you Michael. Ind won as many games in that series as the Tests Eng have won in Aus in last 12 years 😏 https://t.co/R0JZzl062x
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 11, 2024
भारताने श्रीलंकेत 3 सामन्यांची टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली. सूर्यकुमार यादव टी20 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार होता. तर वनडे मालिकेत रोहित शर्माने संघाची कमान सांभाळली होती. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 मालिकेत श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला. तर वनडे मालिकेत भारताने क्लीन स्वीप टाळला. श्रीलंकेने भारताचा 2-0 असा पराभव करत मालिका जिंकली. मालिकेतील पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला होता.
भारतीय संघ यानंतर आता थेट सप्टेंबर महिन्यात मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.
हेही वाचा –
आश्चर्यकारक! स्टंपला चेंडू लागला तरीही फलंदाज बाद नाही, पाहा VIDEO
धाडसी फलंदाज, भारताच्या मधल्या फळीचा कणा! 1983 वर्ल्डकप विजयाच्या हिरोचा आज वाढदिवस
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं