आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस (१८ जून) विना नाणेफेक आणि एकाही चेंडूचा खेळ न होता वाया गेला. सततचा पाऊस व त्यामुळे ओले झालेले मैदान यामुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ रद्द केला गेल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने ट्विट करत भारतीय संघावर बोचरी टीका केली आहे.
वॉनने केले वादग्रस्त ट्विट
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखला जातो. यावेळी त्याने ट्विट केले असून, भारतीय संघावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याबाबत टिका केली. वॉनने या अंतिम सामन्याबाबत ट्विट करताना लिहिले, ‘मला वाटते की, वातावरणाने भारतीय संघाला वाचवले.’ यावर वॉनने हसण्याचा इमोजी वापरला आणि टेस्ट चॅम्पियनशिप फायनल असा हॅशटॅग दिला.
I see India have been saved by the weather …. 😜 #WorldTestChampionship
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 18, 2021
भारताविरुद्ध नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतो वॉन
इंग्लंडचा माजी कर्णधार असलेला मायकल वॉन सध्या प्रसिद्ध समालोचक म्हणून ओळखला जातो. मात्र, यासोबतच तो भारत आणि भारतीय क्रिकेट संघाविषयी नेहमी गरळ ओकताना दिसतो. त्यामुळे, भारतीय चाहते त्याला नेहमीच ट्रोल करत असतात. तसेच, अनेक आजी-माजी भारतीय क्रिकेटपटू देखील त्याला उत्तर देताना दिसतात.
पहिला दिवस गेला वाया
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ जूनपासून एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर सुरू होणार होता. परंतु, दोन दिवसांपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याने तीन तासाच्या प्रतीक्षेनंतर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याची घोषणा आयसीसीने केली. आयसीसीने या सामन्यासाठी एक राखीव दिवस देखील ठेवला आहे. परंतु, पुढील चार दिवस एजबॅस्टन येथे पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला असून, पूर्ण पाच दिवस खेळ होईल याची शक्यता अत्यंत धूसर आहे.
महत्वाच्या बातम्या-
वाचाल तर वाचाल! सामना सुरू होण्याआधी न्यूझीलंडच्या खेळाडूंचा फोटो व्हायरल
WTC Final 2021: पावसाचा खेळ सुरुच राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द
WTC Final: पावसामुळे चिंतेचे कारण नाही, आयसीसीची ‘ही’ तरतुद भरून काढणार वाया गेलेला वेळ