मार्च २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळला होता. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला एका वर्षासाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निलंबित केले होते. तसेच २ वर्षांसाठी त्याच्या नेतृत्त्वपदावर प्रतिबंध घालण्यात आले होते. आता त्याच्या नेतृत्त्वावरील २ वर्षांच्या बंदीचा कालावधी संपला आहे. त्यामुळे स्मिथच्या हातात संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात येतील का नाही?, याची चर्चा रंगू लागली आहे. अशात इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी आपले मत मांडले आहे.
स्मिथ कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार
क्रिकबझशी बोलताना वॉन म्हणाले की, “स्टिव्ह स्मिथचा टी२० क्रिकेटमधील फॉर्म जास्त चांगला नाही. पण त्याच्या कसोटी आणि वनडे क्रिकेटमधील फॉर्मला पाहता त्याला संघाचा कर्णधार करण्यात यावे. टिम पेन किंवा ऍरॉन फिंच यांच्या गैरहजेरीत नेतृत्त्वपदासाठी स्मिथ हा चांगला पर्याय ठरेल. टिम पेन पुढील वर्षी ऍशेस सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्त्व करेल. परंतु जर पेन किंवा फिंच यांच्यापैकी एकालाही दुखापत झाली. तर स्मिथला संघाचा कर्णधार करण्यात यावे.”
“संघाचे नेतृत्त्व करण्याच्या मोठ्या जबाबदारीमुळे स्मिथच्या फलंदाजीवर कसलाही परिणाम होणार नाही. तो एक उत्कृष्ट कर्णधार आहे. तसेच तो संघासाठी उत्कृष्ट रणनितीदेखील आखू शकतो. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया संघात धोरणात्मक बदल घडवून आणू शकतो. सर्वजण चेंडू छेडछाड प्रकरणाला विसरुन गेले आहेत. क्रिकेटक्षेत्रही वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे स्मिथला वनडे किंवा कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविण्याची संधी देण्यात यावी,” असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
टी-२० मालिकेनंतर चर्चा ऐरणीवर
भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार ऍरॉन फिंच दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने संघाचे नेतृत्व केले होते. कसोटी मालिकेत देखील टीम पेन हाच ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार आहे. परंतु स्टिव्ह स्मिथने फलंदाजीत दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला कर्णधार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
संबधित बातम्या:
– या कारणामुळे स्मिथला दुसर्या सामन्यात करता आले नाही नेतृत्त्व
– स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद सोपवल्यास; ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक मॅथ्यू वेडचे मोठे विधान
– पुन्हा ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद स्वीकारण्यास स्मिथ तयार? म्हणाला