पाकिस्तान क्रिकेट मध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा हे पायउतार झाले. तसेच, निवड समिती देखील बरखास्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनाही आपल्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जातेय. त्यांच्या जागी संघाचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांची नियुक्ती केली जाईल.
पाकिस्तान संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडने कसोटी मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर पीसीबी अध्यक्ष राजा यांनी आपले पद सोडले. तसेच, निवड समिती देखील बरखास्त करण्यात आली. पीसीबीचे नवे अध्यक्ष म्हणून नजम सेठी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर, अंतरीम मुख्य निवड समिती अध्यक्ष म्हणून शाहिद आफ्रिदी भूमिका पार पाडेल. तसेच, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर संघाचे सध्या मुख्य प्रशिक्षक असलेले सकलेन मुश्ताक राजीनामा देतील. त्यांच्या जागी मिकी आर्थर कार्यभार सांभाळतील. नवे अध्यक्ष सेठी यांनी दिलेल्या प्रस्तावाला आर्थर यांनी होकार दर्शवला आहे.
मिकी आर्थर यांनी यापूर्वी देखील पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक सांभाळले होते. 2016 ते 2019 या कालावधीत त्यांनी पाकिस्तान संघासह काम केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पाकिस्तानने 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केली होती. मात्र, प्रशिक्षक म्हणून त्यांचा पाकिस्तान संघासोबतच्या एकूण कामगिरीचा आढावा घेतल्यास ती तितकी सक्षम वाटत नाही. त्यांच्या मार्गदर्शनात पाकिस्तानने 133 सामने खेळले. त्यातील 72 सामन्यात विजय तर 58 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. दोन सामने अनिर्णित तर एक सामना बरोबरीत सुटलेला. 2019 विश्वचषकानंतर त्यांनी संघाची साथ सोडलेली.
आर्थर यांच्यावर पाकिस्तान संघात फूट पाडल्याचा आरोप केला जातो. अनेक माजी वरिष्ठ खेळाडूंना संघातून बाहेर करण्यात त्यांचा हात होता असे म्हटले जाते.
(Micky Arthur Accept PCB Chief Offer For Head Coach)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या ‘या’ कृत्यावर संतापले चाहते, हार्दिकच्या व्हिडिओमुळे पेटला नवा वाद
डीन एल्गरला सांताकडून ‘गिफ्ट’! चेंडू स्टम्पला लागूनसुद्धा राहिला नाबाद, व्हिडिओ व्हायरल






