झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश यांच्यात सध्या टी२० मालिका रंगली असून शुक्रवार रोजी (२३ जुलै) या मालिकेतील दुसरा टी२० सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान झिम्बाब्वेने बांगलादेशपुढे १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाहुणा संघ १४३ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी झिम्बाब्वेने २३ धावांनी हा सामना खिशात घातला. दरम्यान एक असाधारण घटना घडली, जी पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
झिम्बाब्वेच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघ संघर्ष करताना दिसत होता. १७.१ षटकापर्यंत त्यांनी ८ गडी गमावत केवळ १२७ धावा केल्या होत्या. मोहम्मद सैफद्दीन आणि तस्किन अहमद मैदानावर उपस्थित होते. याच अठराव्या षटकादरम्यान ही असामान्य घटना घडली. सैफुद्दीन फलंदाजीसाठी खेळपट्टीवर सज्ज उभा होता. गोलंदाजानेही षटकातील पाचवा चेंडू टाकला आणि त्यावर सैफुद्दीनने लाँग ऑनला साधारण फटका मारला.
इतक्यात यष्टीमधील मधली यष्टी मागे सरकली आणि त्यावरील बेल्स मैदानावर पडल्या. हे पाहून झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंनी पंचांकडे हिट विकेटसाठी जोरदार अपील केली. पण घडलेला प्रकार पाहून स्वत सैफुद्दीन मात्र थक्क झाला होता. आपण यष्टीपासून इतक्या दूर असूनही कसे काय हिट विकेट झालो? हे त्याला समजत नव्हते. पंचांनीही घाई न करता तपासणीनंतर योग्य त निर्णय घेतला.
त्यांनी पडताळणी केल्यानंतर असे लक्षात आले की, सैफुद्दीनच्या बॅटला चेंडू लागण्यापुर्वीच मधली यष्टी आपोआप मागे सरकली आणि त्यावरील बेल्स खाली पडले. यामध्ये सैफुद्दीनचा कसलाही हात नव्हता. या अनोख्या घटनेनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यष्टी आपोआप कशी काय हालू शकते या विचाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेकांनी कदाचित वाऱ्यामुळे असे झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला आहे.
Have never seen anything like this. Middle stump moved on its own and the bails fell. Everyone thought it was hit wicket, yet Saifuddin was nowhere near the stumps.
PS Congratulations to Zimbabwe on a series-levelling win!#ZIMVBAN #Cricket pic.twitter.com/K2g8Avzv6t
— CricBlog ✍ (@cric_blog) July 23, 2021
Confusion in Harare after a bail falls off… the Zimbabwe players think Mohammad Saifuddin is out hit-wicket, but replays show that a stump moved slightly before the batter played the shot, resulting in the bail falling 😱 #ZIMvBAN
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 23, 2021
दरम्यान सैफुद्दीनने अखेरच्या षटकांत आक्रमक फटकेबाजी करत संघाला विजयाच्या नजीक पोहोवण्याचा प्रयत्न केला. परंतु १५ चेंडूत प्रत्येकी १ षटकार आणि चौकार मारत १९ धावा करुन ल्यूक जॉग्न्वेच्या चेंडूवर झेलबाद झाला.
या सामन्यात ५७ चेंडूत ७३ धावांची तूफानी खेळी करणाऱ्या झिम्बाब्वेचा अष्टपैलू वासले माधेवेरे याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘होय, तो शो टॉपर आहे’; पाहा स्वत: विस्फोटक फलंदाज असणाऱ्या सूर्यकुमारने कोणाचं केलंय इतकं कौतुक?
‘टीम इंडियाची प्रगती पाहून वाटतंय, आम्ही अजून २ संघ निवडून कोणतीही स्पर्धा जिंकू’
बिग हिटर लिव्हींगस्टोन! तब्बल १२२ मीटरच्या षटकारानंतर, पुन्हा ठोकला ‘इतका’ मोठा गगनचुंबी सिक्सर