ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षपदामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळाला. माईक हेबर्ड हे पुढील अध्यक्ष असणार आहेत. ते अध्यक्ष बनल्यामुळे नवीन नोकरीसाठी लचलान हेंडरसन राजीनामा देत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आरोग्य विमा देणाऱ्या कंपनी एचबीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सांभाळत असल्यामुळे ते क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्षपद सांभाळू शकत नाहीत. अशात त्यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला.
खरं तर, पर्थ हे लचलान हेंडरसन (Lachlan Henderson) यांचे मूळ गाव आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट वेबसाईटशी बोलताना सांगितले की, “मी नुकतेच पर्थ येथे नवीन जबाबदारी सांभाळली आहे. अशात मी माझ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ पदासाठी योग्य वेळ देऊ शकत नाहीये. त्यामुळे मी ही भूमिका इतर कुणाकडे सोपवण्याची ही योग्य वेळ आहे.”
फेब्रुवारी ते डिसेंबर कार्यकाळ
अर्ल एडिंग्स यांनी पद सोडल्यानंतर हेंडरसन यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अध्यक्ष रिचर्ड फ्रीडेंस्टीन यांच्याकडून क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कारभार हाती घेतला होता. मात्र, आता डिसेंबरमध्ये ते क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कारभारातून मुक्त झाले आहेत. त्यांच्या जागी माईक बेयर्ड (Mike Baird) यांची वर्णी लागली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर मागील 18 महिन्यात चौथ्यांदा बदल पाहायला मिळत आहे.
He will be replaced by current board member and former NSW Premier Mike Baird.https://t.co/Ov8xAUdIul
— cricket.com.au (@cricketcomau) December 11, 2022
अध्यक्ष बनल्यामुळे खुश आहेत बेयर्ड
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे माईक बेयर्ड खूपच खुश आहेत. त्यांनी म्हटले आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी काम करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी शक्य ती प्रत्येक गोष्ट करेल, ज्याने या खेळात आणखी विकास होईल. अध्यक्ष बनल्यानंतर आता मला क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले आणि त्यांच्या टीमसोबत काम करण्याची संधी मिळेल.
माईक बेयर्ड असतील क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष
माईक बेयर्ड यांना बोर्डाच्या सदस्यांनी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सर्व संचालक आणि प्रांतीय प्रमुखांचा पाठिंबा आहे. ते पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात या पदावर विराजमान होतील. बेयर्ड हे 54 वर्षांचे आहेत. ते 2014 ते 2017दरम्यान न्यू साऊथ वेल्सचे पंतप्रधान होते, तर 2020मध्ये ते क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी जोडले गेले होते. (mike baird appointed chair of cricket australia lachlan henderson resign read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किशनच्या प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा, बऱ्याच वर्षांआधी धोनीने व्यक्त केले होते मत
पुत्र व्हावा ऐसा गुंडा! ईशानच्या यशाने भारावले आई-वडील; म्हणाले…