ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज या कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या कसोटीत 419 धावांनी विजय मिळवला. यासह त्यांनी मालिकेवर 2-0 असा कब्जा केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वेस्ट इंडीजचा दुसरा डाव केवळ 77 धावांवर संपवत हा विजय साकार केला.
ऍडलेड येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेला. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांनी विजय आपल्या नावे केलेला. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने मार्नस लॅब्युशेनच्या 163 व ट्रेविस हेडच्या 175 धावांच्या जोरावर 511 धावांवर आपला डाव घोषित केला.
या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 214 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलिया संघाचा प्रमुख फिरकीपटू नॅथन लायनने सर्वाधिक तीन बळी आपल्या नावे केले. तर, वेस्ट इंडीजसाठी टेगेनरीन चंद्रपॉलने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली.
पहिल्या डावात मिळालेल्या मोठ्या आघाडीचा फायदा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात घेतला. त्यांनी आक्रमकपणे फलंदाजी करताना 199 भावांवर आपला डाव घोषित करत वेस्ट इंडिजसमोर 497 धावांचे आव्हान ठेवले. गोलंदाजांना पोषक झालेल्या या खेळपट्टीवर त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. मिचेल स्टार्क, स्कॉट बॉलंड व मायकल नेसर यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत वेस्ट इंडीजचा डाव 77 धावांवर संपुष्टात आणला.
पहिल्या डावात शतक करणारा ट्रेविस हेड सामनावीर तर, या मालिकेत दोन शतके व एक द्विशतक करणारा मार्नस लॅब्युशेन मालिकावीर ठरला.
(Australia whitewash west Indies in 2 match test Series )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उनादकतच्या पुनरागमनानंतर पाच वर्षापासून बाहेर असलेला फलंदाज मागतोय संधी; ट्विट करत लिहिले, ‘प्रिय क्रिकेट…’
द्विशतक ईशानचं, पण लक्ष वेधतोय विराटचा भांगडा; व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय