15 सप्टेंबर पासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरवात होत आहे. यामध्ये पारंपारीक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यासोबत श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ सहभागी होणार आहेत.
यावेळी भारतीय संघासमोर पाकिस्तानचा तुफान फॉर्ममध्ये असलेला फलंदाज फखर जमानला रोखण्याचे आव्हान असणार आहे.
फखर जमानला रोखण्यासाठी भारतीय संघाच्या मदतीला ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि ‘मिस्टर क्रिकेट’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या माइक हसीने मोलाचा सल्ला दिला आहे.
“फखर जमानसमोर भारतीय गोलंदाजांनी लाईन आणि लेंथने गोलंदाजी करणे गरजेचे आहे. त्याला डावाच्या सुरवातीला जर जोखीम घेण्यास भाग पाडले तर भारतीय गोलंदाज त्याला रोखू शकतील. तसेच त्याच्यासमोर स्लो गोलंदाजी केल्यास भारतीय गोलंदाजांच्या जाळ्यात तो अडकेल.” असा सल्ला माइक हसीने दिला.
गेल्या एक वर्षापासून फकर जमान जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शतक ठोकत पाकिस्तानच्या विजयात त्याचा सिंहाच्या वाटा होता.
तसेच नुकतेच पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील जबरदस्त कामगिरी केली आहे.
या मालिकेतील चौथ्या सामन्यात फकर जमानने नाबाद 210 धावांची खेळी करत, पाकिस्तानकडून पहिले द्विशतक करण्याचा मान मिळवला आहे.
तसेच फकर जमानने एकदिवसीय क्रिकटमध्ये सर्वात कमी सामन्यात एक हजार धावा करण्याच्या विश्वविक्रम केला.
फकर जमानने 18 सामन्यांमाध्ये एक हजार धावा केल्या आहेत. तर यापूर्वी सर्वात कमी 21 डावांमध्ये एक हजार धावा करण्याचा विक्रम सर व्हीव रिर्चड्स यांच्या नावावर होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-सेहवाग, गंभीर आणि आकाश चोप्रा पुन्हा एकत्र, खेळणार नवीन इनिंग
-स्टीव्ह स्मिथ खेळणार आयपीएल सारख्याच मोठ्या लीगमध्ये!