चेन्नई | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या अंतिम ११ खेळाडूंच्या संघामध्ये कुलदीपपेक्षा अश्विनलाच संधी मिळायला हवी.
असे मत मिस्टर क्रिकेट माइक हसीने शनिवारी (२८जुलै) व्यक्त केले.
“मला माहीत नाही भारतीय संघ व्यवस्थापन काय विचार करत आहे. मात्र मला असे वाटते की, कुलदीपपेक्षा अश्विन नक्कीच सरस आहे. अश्विनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा जास्त बळी आहेत. त्यामुळे अंतिम ११ खेळाडूंच्या संघात स्थान प्राप्त करण्यासाठी तो पात्र आहे.” असे हसी म्हणाला.
सध्या माइक हसी तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये समालोचकाची भूमिका बजावत आहे. त्यावेळी त्याने हे मत व्यक्त केले.
तसेस भारतीय संघाच्या इंग्लंडमधील कामगिरी विषयीसुद्धा हसीने त्याचे मत व्यक्त केले.
“भारताचा संघ युवा आणि चांगला आहे. यामधील काही खेळाडूंना इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. ड्यूक बॉल आणि तिथल्या खेळपट्यांशी जुळवून घेतल्यास भारतीय संघाला नक्की यश मिळेल.” पुढे हसी असे म्हणाला.
भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून बर्मिंघहम येथून सुरवात होणार आहे.
या मलिकेत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवला संधी मिळणार की, अनुभवी आर अश्विनला हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-या खेळाडूने घ्यावी रोनाल्डोची जागा, रियल माद्रिदच्या चाहत्यांची मागणी
-सौरव गांगुलीने दिल्या इम्रान खानला शुभेच्छा!