---Advertisement---

आनंदाची बातमी! ‘मिस्टर क्रिकेट’ हसीची कोरोनावर यशस्वी मात; सुखरुप पोहचला आपल्या घरी

On: मंगळवार, मे 18, 2021 7:26 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम ४ मे रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. हा हंगाम सुरु असताना संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने हंगाम स्थगितीचा निर्णय घेतला. हा हंगाम स्थगित झाला तेव्हा चेन्नई सुपर किंग्स संघाचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी आणि गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. पण आता ते पूर्णपण बरे झाले असून आपल्या घरी परतले आहेत.

जेव्हा हसी आणि बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले तेव्हा संपूर्ण चेन्नई संघ दिल्लीमध्ये होता. त्यामुळे हसी आणि बालाजी यांना एअर अँब्यूलन्सने उपचारासाठी चेन्नईला आणण्यात आले होते. आता हे दोघेही बरे होऊन आपापल्या घरी परतले असल्याचे चेन्नई सुपर किंग्सने ट्विट करत सांगितले आहे.

तसेच हसी सोमवारी दोहा मार्गे ऑस्ट्रेलियाला पोहचला आहे. तिथे त्याला नियमांप्रमाणे १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1394320654946627586

आयपीएलमध्ये सहभागी असणारा ऑस्ट्रेलियन सदस्यांचा ताफा मायदेशी पोहचला
खरंतर ज्यावेळी आयपीएल २०२१ हंगाम रद्द झाला त्यावेळी ऑस्ट्रेलिया सरकारने १५ मे पर्यंत भारतातून परत येणाऱ्या नागरिकासांठी सीमाबंदी केली होती. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी असेलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह प्रशिक्षक आणि समालोचक २ आठवड्यांसाठी भारतातून मालदीवला गेले होते. तिथे २ आठवडे राहिल्यानंतर अखेर ३८ जणांचा ऑस्ट्रेलियन सदस्यांचा ताफा बीसीसीआयने व्यवस्था केलेल्या चार्टर फ्लाईटने मालदीवमधून सोमवारी सिडनी येथे पोहचला.

हसी या ताफ्यात नव्हता कारण जेव्हा ऑस्ट्रेलियाचे सदस्य मालदीवला गेले होते, त्यावेळी हसी भारतात उपचार घेत होता. त्यामुळे अखेर तो सोमवारीच दोहामधून ऑस्ट्रेलियाला पोहचला. तो रविवारी मायदेशी जाण्यासाठी रवाना झाला होता.

ऑस्ट्रेलियामध्ये व्हावे लागणार क्वारंटाईन
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की क्रिकेटपटूंनाही सामान्य ऑस्ट्रेलियन नागरिकांसारखीच वागणूक दिली जाणार आहे. त्यामुळे सिडनीमध्ये परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन सदस्यांना १४ दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन रहाणे अनिवार्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

केकेआरच्या ‘या’ खेळाडूचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह, मायदेशी झाला रवाना

बॉल टॅम्परिंग प्रकरण : बॅनक्रॉफ्टच्या आरोपांवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चौकडीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

भारतीय महिला संघ १५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात खेळणार कसोटी सामना? पाहा आत्तापर्यंतची दोन्ही संघांची आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---