पुणे : जी. एम. आर. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजम आंध्र प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये ५७ किलो महिला गटात डॉ. शर्वरी इनामदार यांनी क्लासिक पाॅवरलिफ्टिंग व इक्वीप्ड पाॅवर लिफ्टिंग अशा दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले, तर त्यांच्या आई डॉ. पूर्णा भारदे यांनी ६९ किलो मास्टर ३ वजनी गटामध्ये चुरशीच्या स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली.
स्पर्धेत केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा, ओडिसा, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आदी २२ राज्यांचा सहभाग होता.
सर्व वजनी गटांमधून जास्तीत जास्त वजन उचलणाऱ्या खेळाडूचा “बेस्ट लिफ्टर ऑफ इंडिया” म्हणजेच “स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया” हा मानाचा किताब डॉ. शर्वरी इनामदार यांनी क्लासिक व इक्वीप्ड अशा दोन्ही स्पर्धांमध्ये खेचून आणला. ऑक्टोबर महिन्यात मंगोलिया येथे होणाऱ्या जागतिक पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी दोघी मायलेकींची निवड झाली आहे. (Mileki’s success in the national powerlifting competition. Dr. Double crown for Sharvari Inamdar)
महत्वाच्या बातम्या –
देशासाठी तीन विश्वचषक जिंकणाऱ्या धोनीवर माजी कर्णधाराचा निशाणा; म्हणाले, ‘कर्णधार तोच राहणार…’
विक्टोरियाची 2026 कॉमनवेल्थ आयोजनातून अचानक माघार! नवी दिल्लीत होणार स्पर्धा?